मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ची तब्बल 338 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मंबईतील खासगी कंपनी आणि तिच्या अधिका-यांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच (CBI) ने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कंपनीच्या ठिकाणांवर CBI ने शोध मोहिम राबवली आहे.
कांदिवलीतील एस डी अल्युमिनियम लिमिटेड कंपनी आणि कंपनीचे चेअरमन, संचालक व इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सीबीआयने दिली. तक्रारीनुसार, आरोपी कंपनी अल्युमिनियमची निर्मीती करत असतानाही औषध निर्मीती, अन्न आणि एफएमसीजीचे पॅकिंग बनवत असल्याचे अर्जात म्हटले होते. तसेच बनावट कागदपत्री बँकेत दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यता आला आहे.
या सोबतच कंपनीचा पैसा दुसरीकडे वळवण्यात आला आहे. त्यामुळे एसबीआयला 338 कोटी 52 लाखांचे नुकसान झाल्याचे सीबीआयने सांगितले. याप्रकरणी कंपनी आणि आरोपींशी संबंधीत ठिकाणावर सीबीआयने शोधमोहीम राबवली आहे.
या महत्त्वाच्या बातम्याही वाचा :
( संपादन - सुमित बागुल )
state bank of india duped for 338 crore cbi relieved information
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.