मुंबई : आज मुंबईत मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. तब्बल साडेतीन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत मुख्यत्वे चर्चा झाली. या बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये अशोक चव्हाण यांनी आज मंत्रिमंडळात मराठा समाजासाठीच्या हितासाठी काय निर्णय घेण्यात आले याबाबत माहिती दिली.
यासोबतच राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर दिलेली स्थगिती उठवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करणार असल्याचीही माहिती दिली. आजच राज्य सरकारच्या वतीने अंतरिम स्थगिती उठवावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात अर्ज केल्याची माहितीही अशोक चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, युवकांना दिलासा देण्यासाठी आज मंत्रिमंडळात सखोल चर्चा झाली. यामध्ये मराठा समाजासाठी सरकरणे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत.
आज मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले ९ महत्त्वाचे निर्णय :
state cabinet took nine important decision for maratha community in cabinet meeting
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.