सानपाडा : राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) मुंबई (Mumbai) व मुंबई उपनगर (Mumbai Suburbs) वगळून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) परिपत्रक जारी करून ज्या नगरपालिका,(Municipality) नगरपंचायतींच्या (Nagar Panchayat) मुदती संपत आहेत, त्यांच्या निवडणूक (Election) प्रक्रियेची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या नवी मुंबईतील (Navi Mumbai) इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
नवी मुंबई महापालिकेची पंचवार्षिक मुदत एप्रिल २०२० रोजी संपुष्टात आली आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. मागील दीड वर्षांपासून येथील सर्वपक्षीय,अपक्ष, विविध आघाड्यांचे इच्छुक उमेदवार निवडणूक कधी जाहीर होणार याकडे टक लावून आहेत.
राज्यातील पोटनिवडणूक, इतर राज्यांच्या निवडणुका प्रचंड रणधुमाळीत पार पडल्या तरी नवी मुंबई मनपाच्या निवडणुकीला कोरोना प्रादुर्भावामुळे मुहूर्त मिळेनासा झालेला आहे. इच्छुक उमेदवारांचे प्रभागातील निश्चित केलेले आर्थिक बजेटही कोलमडले आहे.
आता राज्याच्या निवडणूक आयोगाने मुंबई शहर वगळून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना २० ऑगस्ट २०२१ रोजी परिपत्रक जारी केले आहे. त्यात ज्या नगरपालिका, नगरपंचायतींची मुदत डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत संपत आहे किंवा ज्या ठिकाणी नवीन स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात येत आहेत त्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २०११ ची जनगणना व नकाशे गोळा करणे,आकडेवारीनुसार सदस्य संख्या निश्चित करणे अशी निवडणूक पूर्व कार्यवाही २३ ऑगस्ट २०२१पासून सुरू करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकामुळे नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अहोरात्र तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जे परिपत्रक सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काढले ते फक्त मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पूर्वतयारीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत आहे. निवडणुका कधी होतील, याचा त्यात उल्लेख नाही. सध्या कुणीही निवडणूक तारखेबाबत सांगू शकत नाही. नवी मुंबई महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण आधीच जाहीर झाले आहे. फक्त ओबीसी आरक्षणाबाबत अद्याप मार्गदर्शक तत्त्वे जाहीर झालेली नाहीत. त्याबाबत काही बदल झाले तर तूर्तास फक्त आरक्षणात बदल होतील. प्रभागरचना बदलणार नाही. याबाबत निवडणूक आयोगच योग्य मार्गदर्शन करू शकतील.
- विजय नाहटा, शिवसेना उपनेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.