नवी मुंबई : बनावट विदेशी मद्याची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई; आरोपी गजाआड

Fake liquor seized
Fake liquor seizedsakal media
Updated on

नवी मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Maharashtra excise department) भरारी पथकाने एका टॅक्सीवर तसेच कोपरखैरणेतील घरावर छापा मारून सुमारे १४ लाख ३५ हजार रुपये किमतीचा बनावट विदेशी मद्यसाठा (fake foreign liquor seized) व इतर साहित्य जप्त केले. यात अल्पवयीन तरुणासह तिघांना (culprit arrested) ताब्यात घेतले आहे.

Fake liquor seized
चांदोरी : एका लग्नाची अनोखी गोष्ट! आधी लसीकरण मग लग्न

बनावट विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्‍याची माहिती मिळताच मंगळवारी दुपारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस.एस.गोगावले, डी विभागाचे निरीक्षक आर.के. शिरसाठ, भरारी पथकाचे निरीक्षक संजय पुरळकर, विजय धुमाळ आदींच्या पथकाने ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे रेल्वे स्‍थानकासमोर मद्याचा साठा घेऊन जाणार संशयित इको कारची तपासणी केली.

यावेळी कारमध्ये मद्याच्या बाटल्या आढळल्‍या. कारमधील सुनील शांतीभाई वाघेला (३५), उमेश जितेंद्र दुबे (३३) व त्यांचा अल्पवयीन साथीदाराची चौकशी केली असता कोपरखैरणे सेक्टर-१९ भाड्याने घेतलेल्या घरात मद्याचा साठा ठेवल्याची माहिती मिळाली. पथकाने संबंधित घरावर छापा मारला असता सीलबंद बाटल्या तसेच रिकाम्या मद्याच्या बाटल्‍या, ८०० विविध ब्रँडचे लेबल, २ ड्रायर असे साहित्य आढळले.

पथकाकडून तिघे ताब्‍यात

कारवाईत उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तुर्भे गावातील बजरंग बेकरी समोर उभी असलेली स्कुटी ताब्यात घेत तपासणी केली असता, स्कुटीमध्येही विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्‍या. कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण १४ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मद्याचा साठा व इतर साहित्य जप्त केले असून तिघांना ताब्‍यात घेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.