मुंबई : केरळच्या कोझिकोडमध्ये नुकतीच भीषण विमान दुर्घटना घडली होती. यामध्ये वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईवरून प्रवाशांना कोझिकोडमध्ये आणलं जात होतं. या भीषण दुर्घटनेत मुख्य पायलट आणि को पायलट यांच्यासोबत एकूण १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यातले मुख्य वैमानिक विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांच्यावर आज राज्यसरकारतर्फे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत सर्व नियम पाळून विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांना अखेरचा निरोप दिला गेला.
केरळच्या कोझिकोडमध्ये भीषण विमान दुर्घटना घडली होती. मुसळधार पावसामुळे टेबल टॉप धावपट्टीवरून विमान घसरून ते पुढे दरीत कोसळल्याने अपघात झाला होता. या विमानामध्ये एकूण १९१ प्रवासी होते.
कोण होते दीपक वसंत साठे ?
state funaral for wing commander caption deepak sathe at vikroli mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.