मुंबई : लवकरच कोव्हिड लस येण्याची शक्यता बघता राज्य शासनाने आणि मुंबई महानगर पालिकेने लस देण्यासाठी प्राधान्य यादी तयार करण्यास सूरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेने सगळ्या रूग्णालयांना पत्र लिहून हेल्थ केअर वर्कर्सची माहिती मागवली आहे. जेणेकरून त्यांचा प्राधान्यक्रम ठरवता येईल. लसीकरणाच्या पहिल्या फेरीत हेल्थ केअर वर्कर्सना प्राधान्य दिलं जाणार आहे. आतापर्यंत केईम आणि सायन रूग्णालयाच्या 8000 कर्मचार्यांनी या यादीत नाव नोंदवलं आहे. केंद्र सरकारच्या सूचनांवरून पालिका हा डेटाबेस तयार करतेय.
पालिकेने सगळ्या रूग्णालयांना पत्र लिहिले असून हेस्थकेअर वर्कर्सची माहिती मागवली आहे. ऐनवेळी गोंधळ होऊ नये म्हणून सदर माहिती मागवली असल्याचं समजतंय. पालिकेने रूग्णालयांना दिलेल्या पत्रकानूसार हेल्थकेअर वर्कर्सचं लसीकरण जानेवारी महिन्यापासून सूरू होण्याचा अंदाज आहे. लवकरच कोव्हिड लस येण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने हेल्थकेअर वर्कर्सची माहिती घेण्याचे आदेश सगळ्याच महानगर पालिकांना दिले आहेत.
राज्य सरकारच्या आदेशानूसार, आम्ही सगळ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यास सूरवात केली आहे, असे पालिकेचे आरोग्य अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.
नायर रूग्णालयाच्या 3500 कर्मचार्यांची नोंदणी झाली आहे. प्राधान्यानुसार लस दिली जाईल. मात्र, लस यायला किमान जानेवारी उजाडेल. केईएम आणि सायनच्या 8000 कर्मचार्यांची नोंदणी केली आहे, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले आहे.
महत्त्वाची बातमी : आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून दिले जीवनदान, मातेची यशस्वी प्रसूती
हेल्थकेअर वर्कर्सना त्यांचं नाव, पत्ता, सहव्याधी, घेत असलेली औषधे आणि आजारांची माहिती द्यावी लागते. डेटाबेसमध्ये वेगवेगळ्या श्रेणी असून हेल्थकेअर वर्कर्स, एमबीबीएस डाॅक्टर्स, आयुष प्रॅक्टीशनर्स, नर्सेस, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि इतर ज्यांनी कोविड 19 विरोधात आपली सेवा बजावली आहे. त्या सर्वांचा यात समावेश असणार आहे. पालिका अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी ज्यात डॅाक्टर्स, नर्स, वॅार्ड बाॅय आणि पॅरामेडीकल स्टाफ यांची नोंदणी होईल
केंद्राच्या माहितीनुसार, 3 कोटी फ्रंट लाईन वर्कर्सना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे.
state government is creating database for giving covid vaccine to health workers
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.