Aarey: आरे संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती; राज्य सरकारचे नोटिफिकेशन जारी

Aarey Milk Colony a green zone: राज्य सरकारने आरे मिल्क कॉलनीतील १३२ हेक्टर (जवळपास ३२६ एकर) जमीन ग्रीन झोन म्हणून औपचारिकरित्या घोषित केली आहे. त्यामुळे आता संपूर्ण आरे भाग ग्रिन झोनमध्ये आला आहे.
Aarey Milk Colony a green zone
Aarey Milk Colony a green zone
Updated on

मुंबई- राज्य सरकारने आरे मिल्क कॉलनीतील १३२ हेक्टर (जवळपास ३२६ एकर) जमीन ग्रीन झोन म्हणून औपचारिकरित्या घोषित केली आहे. त्यामुळे आता संपूर्ण आरे भाग ग्रिन झोनमध्ये आला आहे. आरेमध्ये विकास कामांसाठी जागा देण्यात येईल या शंकेवर पडदा पडण्याची शक्यता आहे. (state government has made virtually all of Aarey Milk Colony a green zone)

मुंबईचे फुफुस म्हणून ओळखला जाणारा आरे भाग आता ग्रीन झोनमध्येच राहणार आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी याचे स्वागत केले आहे. नगर विकास विभागाने यासंदर्भातील पत्रक मागील आठवड्यात जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारने तीन वर्षांपूर्वी यासंदर्भात निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरे सरकारने ७०५ एकर आरेची जागा जंगलांसाठी राखीव ठेवली होती.

Aarey Milk Colony a green zone
आरे वसाहतीमधील शाळेचे वेळापत्रक बदलण्यास विरोध

ग्रिन झोनमध्ये घेण्यात आलेली १३२ हेक्टर जागा ही राजीव गांधी नॅशनल पार्कच्या इको-सेन्सेटिव्ह झोनमध्ये येते. १६६ हेक्टर पैकी ३३ हेक्टर जागा ही मेट्रो ३ कार शेडसाठी वापरली गेलीये. आरे मिल्क कॉलनी ही गोरेगाव उपनगराचा एक भाग आहे.

Aarey Milk Colony a green zone
आरे कॉलनीत कृत्रिम तलावांची संख्या वाढवा

काय आहे प्रकरण?

राज्य सरकारने आता सर्व आरे मिल्क कॉलनीला ग्रीन झोन म्हणून जाहीर केलं. अरे भागाचं संरक्षण करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांकडून होत होती. यासाठी काही वर्षांपूर्वी मोठे आंदोलन देखील उभारण्यात आले होते. यासंदर्भातील नोटिफिकेशन मागील आठवड्यात जाहीर करण्यात आलंय. यात १३२ हेक्टर जमिनीला देखील ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आलंय.

२०१६ मध्ये, राज्य सरकारने आरे भागातील १६५ हेक्टर जागा इको-सेन्सेटिव्ह झोनमधून eco-sensitive zone (ESZ) वगळण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारने केली होती. ती स्वीकारण्यात आली. या १६३ पैकी ३३ हेक्टर जागा मेट्रो ३ कार शेडसाठी वापरण्यासाठी होती. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.