मुंबई : राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. आज राज्यात तब्बल २,४३६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५२,६६७ झाली आहे. तर आज ६० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा १,६९५ इतका झाला आहे. आज १,१८६ रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण १५,७८६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात ६० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८, पुण्यात ११, नवी मुंबईत ३, ठाणे शहरात २, औरंगाबाद शहरात २, सोलापूरात १, कल्याण डोंबिवलीमध्ये १, रत्नागिरीमध्ये १ मृत्यू झाले आहेत. याशिवाय बिहार मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४२ पुरुष तर १८ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २७ रुग्ण आहेत तर २९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ०३ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ४७ जणांमध्ये ( ७८%) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १,६९५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,७८,५५५ नमुन्यांपैकी ५२,६६७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ३५,१७८ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या २,३९१ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६,१०६ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६६.०१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
आजपर्यंत राज्यातून १५,७८६ रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ५,३०,२४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५,४७९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
state has noticed new 2436 new cases of corona read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.