Nitesh Rane: भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश सचिवांनी केली नितेश राणेंवर कारवाईची मागणी

BJP Maharashtra: वातावरण बिघडविणाऱ्या अशा लोकांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी
Nitesh Rane: भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश सचिवांनी केली  नितेश राणेंवर कारवाईची मागणी
Updated on

आम्ही मुस्लिम धर्मीय नेहमीच हिंदू धर्म आणि त्यांच्या देवी-देवतांचा नेहमीच सन्मान करतो आणि आदरही करतो, मात्र भाजप आमदार नितेश राणे वारंवार मुस्लिम धर्माबद्दल अपशब्द वापरून मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावतात, त्यामुळे नितेश राणे यांच्यावर पक्षाने कडक कारवाई करावी यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.

याबाबत अनेकदा तक्रार करूनही आमदार नितेश राणे यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने आम्ही अत्यंत दुःखी असल्याचे म्हणत भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव रेहान मेमन यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

Nitesh Rane: भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश सचिवांनी केली  नितेश राणेंवर कारवाईची मागणी
Nitesh Rane: नितेश राणेंची अटक टळली! मुंबई हायकोर्टानं अजामीनपात्र वॉरंट केलं रद्द, पण...

रेहान मेमन यांनी नितेश राणे यांच्याबद्दल तक्रार करत ते जेव्हा जेव्हा मुस्लिम धर्माविरोधात वक्तव्य करतील, तेव्हा तेव्हा आम्ही त्यांचा विरोध करू असे ठणकावून सांगत मंगळवारी (ता. १५) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला. या वेळी त्यांच्यासोबत हाजी जहूर अहमद, हिना खान, यासिन खान आणि शफीरुद्दीन खान उपस्थित होते.

रेहान मेमन पुढे म्हणाले की, यती नरसिंहानंद सरस्वती आणि रामगिरी बाबा यांनीही आमच्या धर्माबद्दल आणि मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अपशब्द वापरले. सरकारने त्यांच्यावरही कारवाई केली नाही.

Nitesh Rane: भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश सचिवांनी केली  नितेश राणेंवर कारवाईची मागणी
Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची उच्च न्यायालयात धाव, वाचा नक्की काय आहे प्रकरण

हे अत्यंत लज्जास्पद असून या घटनांमुळे आमचा समाज फारच दुखावलेला आहे. कोणत्याही धर्माविरोधात अपमानास्पद वक्तव्य करून धर्माधर्मात तेढ निर्माण करून समाजातील वातावरण बिघडविणाऱ्या अशा लोकांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Nitesh Rane: भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश सचिवांनी केली  नितेश राणेंवर कारवाईची मागणी
Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.