'एसटी'चा काखेत कळसा आणि गावाला वळसा; थर्मल मशीनच्या वापराबाबत महिनाभरानंतर आली जाग...

'एसटी'चा काखेत कळसा आणि गावाला वळसा; थर्मल मशीनच्या वापराबाबत महिनाभरानंतर आली जाग...
Updated on

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांच्या शरिराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्क्रिनींग मशीनची मागणी वाढली आहे. माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीत अत्याधुनिक ब्रेक डाऊन मशीन आणली होती. त्यामध्येच अत्याधुनिक थर्मल स्क्रिनिंग मशीनची सुविधा होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होऊन महिना उलटत आला तेव्हा आपल्याकडे असलेल्या थर्मल स्किनींग मशीनचा एसटी महामंडळाला शोध लागला आहे. 

एसटी महामंडळाच्या बसेस घाट रस्त्यांवर किंवा अपघात झाल्यास त्यांना आगारापर्यंत आणण्यासाठी माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अत्याधुनिक ब्रेक डाऊन व्हॅनची सुविधा एसटीला उपलब्ध करून दिली होती. त्यामध्ये संगणकीकृत साहित्य आहे. अत्याधुनिक यंत्रणा आहे. प्राथमिक उपचाराची सोय आहे. त्यासोबतच थर्मल स्क्रिनींग मशीन सुद्धा आहे. मात्र, आजपर्यंत या व्हॅनचा एसटी महामंडळाने उपयोगच केला नसल्याने, या व्हॅन निरूपयोगी अवस्थेत पडल्या आहे. 

एसटीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना या व्हॅनमधील सुविधेचा थांगपत्ताच नाही. मात्र, आता अचानक एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी थर्मल स्क्रिनींग मशिनची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचा गाजावाजा सुरू केला आहे. खरतरं एसटी महामंडळलाच तब्बल एक महिन्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या थर्मल स्क्रिनींग मशीनचा वापर करण्यासाची जाग आली असल्याचे दिसून येत आहे. 

कोरोनासारख्या महामारीत एसटीचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत आहे. कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून त्यांच्या मनात रोज भीती असतांना, एसटीकडून मात्र, कर्मचाऱ्यांना फारशा सुविधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत थर्मल मशीनच्या सुविधेचा वापर उशीरा केला जात आहे. आपल्याकडे असलेल्या संसाधनांकडे एसटीच्या अधिकाऱ्यांचे लक्षच नाही की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.  
---------------
सुमारे 100 ब्रेक डाऊन व्हॅऩ
राज्यात 250 एसटीचे आगार आहे. यामध्ये एसटी महामंडळाकडे सुमारे 100 ब्रेक डाऊन व्हॅन असून, त्यामध्ये थर्मल स्क्रिनींग मशिन आहे. मात्र, त्याचा कोणताही उपयोग केला नसल्याने अनेक जिल्ह्यातील एसटी डेपोमध्ये कर्मचारी आपला जिव धोक्यात घालून अत्यावश्यक सुविधा देत आहे.

ब्रेक डाऊन व्हॅनची संपूर्ण माहिती घेऊन, त्या आतापर्यंत का वापरण्यात आल्या नाही. किंवा त्यामध्ये काय सुविधा आहे, वापरण्यासाठी उशीर का झाला, यासंदर्भात आताच काही सांगता येणार नाही. यासंदर्भात संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच, काय कारवाई करता येईल यासंदर्भातील माहिती देईल.

- शेखर चन्ने, प्रभारी व्यवस्थापकिय संचालक,
एसटी महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.