Mumbai : पावसाळ्यात मुंबईतील पूरपरिस्थितीचे आव्हान टाळण्यासाठी सतर्क राहा; इकबाल सिंह चहल

महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची अधिकाऱ्याना सूचना
Stay alert to avoid challenge of flooding in Mumbai during monsoons Iqbal Singh Chahal
Stay alert to avoid challenge of flooding in Mumbai during monsoons Iqbal Singh Chahalsakal
Updated on

मुंबई : पर्यावरणीय बदलांमुळे प्रत्येक ऋतूवर या बदलांचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळेच मुंबईतील विविध यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात पूरपरिस्थितीच्या आव्हानावर मात करण्यासाठी सज्ज रहावे.

पूरपरिस्थितीचा सामना करण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबईतील सर्व यंत्रणांनी पावसाळ्याच्या कालावधीत योग्य पद्धतीने योगदान दिल्यास शहरावर येणारे संकट एकत्रित प्रयत्नाने टाळता येते.

मुंबईसारख्या मेगासिटीमध्ये पूराचा धोका टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी यंदा पावसाळापूर्व कामांमध्ये चोख भूमिका बजावावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सर्व यंत्रणांना केले.

महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेत आज पार पडलेल्या मान्सूनपूर्व – २०२३ आढावा बैठकीत सर्व यंत्रणांनी पावसाळ्यातील पूराच्या आव्हानासाठी सज्ज रहावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात आज बैठक संपन्न झाली.

या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प). पी. वेलरासू, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक. लोकेश चंद्र, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी. राजेंद्र भोसले, मुंबई वाहतूक पोलीस सह आयुक्त.

प्रवीण पडवळ, प्रभारी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे). रमेश पवार, महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचे सह आयुक्त श्री. चंद्रशेखर चोरे, सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त. मिलिन सावंत हे उपस्थित होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक. महेश नार्वेकर यांनी संगणकीय सादरीकरण केले.

Stay alert to avoid challenge of flooding in Mumbai during monsoons Iqbal Singh Chahal
Mumbai : 'इन्स्टा रिल' पायी गमावला जीव? डोंबिवलीजवळ रेल्वेची धडक बसल्याने दोघांचा मृत्यू

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त कार्यालयात आयोजित मध्य व पश्चिम रेल्वे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण, भारतीय हवामान खाते, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा, मुंबई मेट्रो, राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम खाते, बेस्ट, विविध विद्युत वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी हजर होते.

त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त व विविध खात्यांचे प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित होते. रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने गतवर्षीच्या पावसाळ्यात अतिशय उत्तम समन्वय साधून काम केल्यानेच उपनगरीय लोकल सेवा अव्याहतपणे सुरू होती.

Stay alert to avoid challenge of flooding in Mumbai during monsoons Iqbal Singh Chahal
Mumbai : अमृत योजनेंतर्गत पाण्याच्या टाकीची कामे चुकीच्या पद्धतीने सुरू; आमदार राजू पाटील भडकले

रेल्वे हद्दीमध्ये मायक्रो टनेलिंग आणि कलव्हर्टच्या सफाईची कामे चांगली झाल्यानेच हे शक्य झाले. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा संथ गतीने निचरा होणाऱ्या ठिकाणी भूमीगत जल - साठवण टाक्यांची उभारणी केली.

त्यामुळे सदर ठिकाणी रेल्वे आणि रस्ते वाहतूक थांबली नाही. यंदाही त्याच धर्तीवर उत्तम समन्वयाने काम करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. रेल्वे परिसरातील वृक्ष छाटणी मोहीम मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी उद्यान विभागाला दिल्या.

यंदा नागरिकांना हवामानाच्या माहितीचे एसएमएस मिळणार - आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून यंदाच्या पावसाळ्याच्या कालावधीसाठी नियंत्रण कक्ष तसेच हवामानाचे वेळोवेळी अलर्ट देणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

Stay alert to avoid challenge of flooding in Mumbai during monsoons Iqbal Singh Chahal
Mumbai : हैड्रोजन टाकीचा स्फोट होऊन ३ कर्मचारी जखमी; पालिकेचा खर्च देण्यास नकार

विभागीय पातळीवर आपत्कालीन परिस्थितीत निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत वेळोवेळी अपडेट्स देणारी मॅसेजची यंत्रणा यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एखाद्या ठराविक भागासाठी हवामानाशी संबंधित अपडेट्स देणारी ही यंत्रणा आहे. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना एमएसमएस उपलब्ध होणे शक्य होणार आहे. एका एसएमएस ॲपच्या सहाय्याने हे एसएमएस अलर्ट नागरिकांना पाठवण्यात येतील.

मुंबईतील ४८० ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप लागणार - अतिवृष्टीच्या काळात पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप हे शहर आणि उपनगरात ४८० ठिकाणी लावण्यात येणार आहेत.

तसेच या पंपांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे संनियंत्रण असणार आहे. महानगरपालिका आयुक्त चहल यांनी पंप ऑपरेटिंगची जबाबदारी असणाऱ्या संबंधितांची यादी सार्वजनिकरित्या जाहीर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्या.

तसेच पाणी साचण्याच्या परिस्थितीत पंप योग्य पद्धतीने काम करतील याची पूर्वतयारी म्हणून मॉक ड्रिल करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. एखादा पंप जर वेळेत व योग्य प्रकारे कार्यरत झाला नाही, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त. चहल यांनी दिले.

रस्त्यांवर खोदकामास परवानगी नाही - मुंबई शहर आणि उपनगरात १५ मे नंतर रस्त्यांवर खोदकामासाठी कोणतीही परवानगी देऊ नये, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त. चहल यांनी सर्व यंत्रणांना दिल्या. अतिशय आपत्कालीन परिस्थितीतच ही परवानगी देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

९ मीटरपेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यांची जबाबदारी आता विभागाकडे - मुंबईतील ९ मीटर रस्त्यांची जबाबदारी ही स्थानिक पातळीवर सहाय्यक आयुक्तांची असणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला असून यापुढे ९ मीटरपेक्षा कमी रस्त्यांची देखभालीची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांकडे असेल,

असेही महानगरपालिका आयुक्त. चहल यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांवर कोणतेही खड्डे नसतील यासाठीचा दौरा सहायक आयुक्त आणि उपआयुक्त यांनी आपल्या विभागात करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

पावसाळी आजारांसाठी ३ हजार रूग्णशय्या सज्ज - आगामी पावसाळी आजारांसाठीची तयारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ३ हजार रूग्णशय्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासोबतच पाण्यामुळे होणाऱ्या आजारांसाठी नमुने घेण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. हिवताप (मलेरिया), डेंग्यू नियंत्रणासाठीची बैठक नुकतीच पार पडली असून जनजागृतीसाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तात्पुरत्या निवाऱ्यासाठी विभागात ५ शाळांची व्यवस्था - आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येक विभागात ५ शाळांमध्ये अतिवृष्टीसारख्या प्रसंगी नागरिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी अन्न आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधा देण्यात येणार आहे.

एनडीआरएफ, भारतीय नौदल, अग्निशमन दलाला सज्ज राहण्याच्या सूचना - या बैठकीला उपस्थित असणाऱया राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एनडीआरएफ) अधिकाऱयांनी पावसाळ्याच्या तयारीबाबत माहिती देताना सांगितले की, मुंबईत आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यासाठी एनडीआरएफचे ३ चमू सज्ज असणार आहेत.

तर पूर्व उपनगरासाठी अतिरिक्त चमू तैनात ठेवण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त. चहल यांनी दिल्या. भारतीय नौदलालाही त्यांच्या चमू आणि पाणबुडे (डायव्हर्स) यासह सुसज्ज राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तर अग्निशमन दलानेही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिले.

धोकादायक इमारतींसाठी मोहीम राबवा - सी १ श्रेणीतील धोकादायक इमारतींबाबत सदर इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या नोटीस बजावण्याच्या तसेच रहिवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्याही सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये धोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा खंडित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.

राडारोडा उचला - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील विविध कामे आणि मेट्रो इत्यादी कामांच्या ठिकाणी कोणताही राडारोडा राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित यंत्रणेने घ्यावी. प्रत्येक विभागातील सहायक आयुक्तांनी आपल्या विभागातील राडारोडा काढण्यासाठीचा समन्वय यंत्रणेशी साधावा. तसेच याबाबतची माहिती संबंधित यंत्रणांना द्यावी, असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले.

दरडी कोसळण्याच्या ठिकाणी उपाययोजना करा - मुंबईत पूर्व उपनगरांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका आहे. याठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचे काम विविध यंत्रणांच्या माध्यमातून सुरू आहे.

त्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर योग्य समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त. चहल यांनी दिले. खासगी इमारतींच्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यासाठी धोरण निश्चिती करण्याचा विषय शासन पातळीवर प्रस्तावित आहे.

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांच्या रस्त्यांची देखभाल काटेकोरपणे करा - मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरातील द्रुतगती मार्गांवरील देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी यंदा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे आहे.

त्यामुळे दोन्ही द्रुतगती मार्गावर खड्ड्यांच्या समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागणार नाही, याची खबरदारी ही सहायक आणि उपआयुक्तांनी आपल्या विभागवार घ्यावी. विविध यंत्रणांच्या ६ फ्लायओव्हरच्या देखभालीची जबाबदारीही महानगरपालिकेकडे असणार आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावर कामाची देखरेख विभागीय पातळीवर काटेकोरपणे व्हावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

आपल्या विभागातील नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करा - अनेक लोकप्रतिनिधींनी मुंबई शहर आणि उपनगरात नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची तपासणी करण्याच्या कामांचा पाहणी दौरा सुरू केला आहे.

या दौऱ्यातून मिळणाऱ्या सूचना आणि माहिती याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विभागीय पातळीवर सहायक आयुक्त आणि उपआयुक्त यांनी दौरा करावा. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची वेळोवेळी पाहणी करावी, असेही निर्देश आयुक्त. चहल यांनी यावेळी दिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.