मुंबई- कोरोनाची दुसरी लाट आली असून ती पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयानक आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हॉस्पिटल्स बेड, ऑक्सिजन सिलिंडर कमी पडत असल्याची परिस्थिती आहे. दुसरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. अशात डॉक्टरांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार विरार पूर्वमध्ये समोर आला आहे. आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली. बालाजी हॉस्पिटलमधील हा प्रकार असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (The stick broke in the nose while testing corona Beating the doctor)
एक महिला बालाजी हॉस्पिटलमध्ये आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी गेली होती. टेस्ट करत असताना महिलेच्या नाकात आरटीपीसीआरसाठी वापरली जाणारी स्टिक तुटली. यावेळी डॉक्टर पळून जात असल्याचा समज करत नातेवाईकांनी पोलिसांना मारहाण सुरु केली. या घटनेचा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. या प्रकरणात नातेवाईकांच्या विरोधात विरार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पोलिसांनी डॉक्टरांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नाही. संबंधित व्हिडिओ नातेवाईकांकडूनच शूट करण्यात आल्याचं समजतंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.