'बळीचा बकरा शोधू नका', निलोफर मलिकचं देवेंद्र फडणवीसांना उत्तर

"कपाटामध्ये लपवलेले सांगाडे नसतील, तर त्यांना पत्रकार परिषदेची चिंता वाटणार नाही"
'बळीचा बकरा शोधू नका', निलोफर मलिकचं देवेंद्र फडणवीसांना उत्तर
Updated on

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) नवाब मलिक (Nawab malik) यांनी आज पत्रकार परिषदेत आरोप केल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी सूचक टि्वट केलं. फडणवीसांनी केलेल्या टि्वटमध्ये कोणाचही नाव घेतलं नव्हतं. अगदी नेमक्या शब्दात विरोधकांचा समाचार घेतला होता. आता नवाब मलिकांची मुलगी निलोफर मलिकने (Nilofer malik) फडणवीसांच्या त्याच टि्वटला उत्तर दिलं आहे. "आयुष्यात एक बळीचा बकरा शोधू नका. आपण केलेल्या चुकांची फळ भोगायला तयार राहा" असं निलोफरने म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी काय टि्वट केलं होतं

'आजच्या दिवसाचा विचार' असं म्हणत त्यांनी जॉर्ज बनार्ड शॉ यांचा कोट टि्वट केला. "डुकराशी कुस्ती खेळू नये, हे मी आधीच शिकलो आहे. तुमच्या अंगाला घाण लागते, पण डुकराला ते आवडतं" असं फडणवीस यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं होतं.

'बळीचा बकरा शोधू नका', निलोफर मलिकचं देवेंद्र फडणवीसांना उत्तर
प्रियकराने गर्लफ्रेंडच्या घरात उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

निलोफर यांनी अमृता फडणवीस यांनाही उत्तर दिलं

सध्या राज्यात नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना रंगला आहे. दोघांनी परस्परांना अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. दोघांमध्ये सुरु असलेल्या या वाकयुद्धात फडणवीसांची पत्नी अमृता आणि नवाब मलिकांची मुलगी निलोफर सुद्धा सहभागी झाली आहे. काल रात्री अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांवर टि्वटमधून निशाणा साधला.

'बळीचा बकरा शोधू नका', निलोफर मलिकचं देवेंद्र फडणवीसांना उत्तर
मुंबई पोलिसांना पाहून पळताना आरोपी तिसऱ्या मजल्यावरुन पडला

अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना 'बिगडे नवाब' म्हटलं. प्रत्येकवेळी पत्रकार परिषद घेऊन खोट्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. काळी कमाई आणि जावयाला वाचवणं एवढच यांच लक्ष्य आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली.

त्यावर निलोफर मलिक यांनी टि्वट करुन उत्तर दिलं. "कपाटामध्ये लपवलेले सांगाडे नसतील, तर त्यांना पत्रकार परिषदेची चिंता वाटणार नाही. जेव्हा तुमची सत्याची बाजू असते, तेव्हा क्वचितच तुम्हाला भीती वाटते. त्यांचा द्वेषपूर्ण हेतू असेल, तर ते उघडे पडतील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच आमचा ध्यास आहे" असं निलोफर मलिक यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.