Mumbai High Court : अनधिकृत बांधकाम रोखा आणि कारवाई करा ; मुंबई उच्च न्यायालयाने दिला आदेश

Bombay-High-Court
Bombay-High-Courtsakal
Updated on

Mumbi High Court : कल्याण पूर्वमधील मलंग रोड येथील खासगी आणि शासकीय भूखंडावर उभे राहत असलेली अनधिकृत बांधकामे रोखून झालेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असल्याची माहिती याचिकाकर्ते सचिन पाटील आणि विनोद तिवारी यांनी दिली आहे.

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील कल्याण-मलंग रोडवर अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. २०१८ मध्ये येथील बांधकामांची नोंदणी बंद झाल्यानंतर यावर काही प्रमाणात या अनधिकृत बांधकामांवर आळा बसला. तरीदेखील काही शासकीय व खासगी जमिनीवर ही अनधिकृत बांधकामे अजूनही सुरू आहेत.

अशीच जर अनधिकृत बांधकामे सुरू राहिली, तर स्मार्ट शहर पाहण्याऐवजी बकाल वस्ती बघावी लागेल. यासाठी सचिन पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद तिवारी हे २०१७ पासून कल्याण-डोंबिवली महापालिकेशी पत्रव्यवहार करत आहेत. याबाबत २०२१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती.

Bombay-High-Court
Mumbai News : खलिस्तान विरुद्ध वृत्त प्रसारित; वृत्तवाहिनीच्या व्यवस्थापकीय संपादकांना धमकी

अखेरीस आता त्यात यश मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले असून आता पोलिस प्रशासनालादेखील याबद्दल निर्देश देण्यात आले असल्याची माहिती याचिकाकर्ते सचिन पाटील व विनोद तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

न्यायालयाच्या आदेशामुळे ही अनधिकृत बांधकामे थांबतील, सोबतच अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाईदेखील होऊ शकेल, अशी आशा याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली आहे. लवकरच पालिका आयुक्त आणि त्यांच्या अधिकारी वर्गाची भेट घेऊन निवेदन आणि न्यायालयाच्या आदेशाची प्रत देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, काही महिने वाट बघणार असून कारवाई न केल्यास पालिकेविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचा इशारा या वेळी याचिकाकर्त्यांनी दिला आहे.

Bombay-High-Court
Mumbai Toll rate Hike: आजपासून सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढला! मुंबईकरांना वाढीव टोलचा भुर्दंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.