मुंबई : ‘विधानसभेच्या निवडणुकीची लढाई ही एक-दोन उद्योगपती विरुद्ध राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला व तरुण अशी आहे. पंतप्रधान मोदींचा मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून ती लुटण्याचे काम सुरु आहे,’’ असा जोरदार हल्ला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज महायुतीवर केला.