Ulhasnagar Crime : उल्हासनगरात कॉलेजच्या वॉचमनकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; नागरिकांकडून चोप, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहरातील कॅम्प नंबर 5 परिसरातील एका प्रसिद्ध कॉलेज मधील वॉचमनने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या घटनेनंतर नागरिकांनी वॉचमनला चांगलाच चोप दिला असून हिललाईन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
student molested by college watchman in Ulhasnagar police arrest accused
student molested by college watchman in Ulhasnagar police arrest accused sakal
Updated on

उल्हासनगर -शहरातील कॅम्प नंबर 5 परिसरातील एका प्रसिद्ध कॉलेज मधील वॉचमनने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या घटनेनंतर नागरिकांनी वॉचमनला चांगलाच चोप दिला असून हिललाईन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

17 वर्षीय विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीसह फंक्शनसाठी कपडे बदलण्यासाठी कॉलेजमध्ये गेली होती.तेंव्हा वॉचमनने तिला "या ठिकाणी कॅमेरे नाहीत, पडद्याच्या मागे कपडे बदला" असे सांगितले आणि त्यानंतर कपडे बदलल्यानंतर "वाव" असे बोलला.विद्यार्थिनीने सदर प्रसंग तिच्या आईला सांगितला,आणि त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी वॉचमनला चांगलाच चोप दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उल्हासनगर विधानसभा उपविभाग अध्यक्ष अजय बागुल यांनी कॉलेजमध्ये जाऊन या घटनेचा जाब विचारला.दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सचिन कदम,शहराध्यक्ष संजय घुगे,

विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष वैभव कुलकर्णी,पदाधिकारी शैलेश पांडव यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन आरोपी विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.संबंधित वॉचमनला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.