मोखाडा - विद्यार्थ्यांची 100 टक्के ऊपस्थिती, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी तसेच दुपारच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा म्हणून शाळेत शासनाकडून मध्यान्ह भोजन दिले जाते. मात्र, गेली दिड ते दोन महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील शाळांना पोषण आहाराचा पुरवठा न झाल्याने, शिक्षकांना ऊधार ऊसणवारीने धान्य आणावे लागत आहे. या भिषण परिस्थितीचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोखाडा पंचायत समिती ला धडक देत, ठिय्या आंदोलन केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व मोखाडा तालुका श्रमजीवी संघटनेने केले होते.