मुंबई : अंधेरीतील पालिकेच्या (bmc) सेव्हन हिल्स रुग्णालयात (seven hills hospital) रुग्णाचा मृत्यू नेमका कोविडनेच (corona death) झाला का, याची खातरजमा करून घेण्यासाठी आता अभ्यास केला जाणार आहे. कोरोनामुळेच रुग्ण दगावला की रुग्णालयात आल्यानंतर त्याला संसर्ग (corona infection) झाला हे शोधण्यासाठी अभ्यास केला जाणार आहे. जवळजवळ दोनशे मृत व्यक्तींच्या वैद्यकीय अहवालाचे (Medical report) विश्लेषण त्यासाठी केले जाणार आहे.
तिसऱ्या लाटेत रुग्णालयात गंभीर रुग्ण दाखल होण्याची संख्या जास्त होती; पण कोविडचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे आढळले नव्हते. अनेकदा एखादी व्यक्ती हृदय किंवा किडनीसारख्या इतर काही आजारांमुळे रुग्णालयात दाखल होते; पण चाचणीनंतर ती कोविड पॉझिटिव्ह आढळते. ती व्यक्ती दगावली तर त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रावर ‘कोविड १९’ असे कारण लिहिले जाते. तेच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण होते का? याचा शोध घेण्यासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टर अभ्यास करत आहेत.
रुग्णालयाचे कोविड विभागप्रमुख डॉ. राजस वाळिंजकर यांनी सांगितले, की डिसेंबर-जानेवारीमध्ये झालेल्या कोरोना मृत्यूंबाबत सध्या अभ्यास सुरू आहे. त्याचा निष्कर्ष अजूनही पूर्णपणे आलेला नाही. आम्ही पुनर्वर्गीकरण करत आहोत. जर रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असेल तर त्याचा नेमका मृत्यू विषाणू संसर्ग किंवा इतर दुसऱ्या कारणातून झाला का, हे तपासण्यासाठी हा अभ्यास केला जात आहे.
उशिरा दाखल झालेल्या, इतर खासगी रुग्णालयातून गंभीर अवस्थेत आलेल्या आणि कोविडसोबत सहव्याधी असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे चित्र आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. कोविडव्यतिरिक्त मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन करावे लागेल. पण कोविडने मृत्यू झालेल्यांचे शवविच्छेदन केले जात नाही. आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्याचे समोर येते, असे सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले.
दोनशे मृतांच्या अहवालाचे विश्लेषण
जवळपास दोनशे मृत व्यक्तींच्या वैद्यकीय अहवालाचे विश्लेषण अभ्यासादरम्यान करण्यात येणार आहे. मात्र, हा अभ्यास पूर्ण व्हायला आणखी थोडा कालावधी जाईल. त्यानंतर त्यातून निष्कर्ष काढता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.