Mumbai News : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सेवानिवृत्त होऊनही कामावर

राज्याचे मुख्य सचिवच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव पदाचा अतिरीक्त कारभार नियमबाह्य पद्धतीने हाकत असल्याचे उघड झाले.
Rajkumar Wardhekar
Rajkumar WardhekarSakal
Updated on

मुंबई - राज्याचे मुख्य सचिवच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव पदाचा अतिरीक्त कारभार नियमबाह्य पद्धतीने हाकत असल्याचे उघड झाले, त्याप्रमाणेच राज्य परिवहन विभागातील भोंगळ कारभार उघड झाला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची १९६५ या जन्मतारखेनुसार ३० सप्टेंबर रोजी सेवा निवृत्ती होणे अपेक्षीत असतांना, शासनाचे आदेश मिळाले नसल्याने अधिकारी अद्याप कर्तव्यावरच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

परिवहन विभागाच्या सेवा जेष्ठता यादीचा घोळ गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे. अनेक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी यादीवर आक्षेप सुद्धा घेतले आहे. मात्र एकाच अधिकाऱ्यांच्या दोन जन्मतारखा कशा असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजकुमार वर्धेकर (बागडी) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून अमरावती आरटीओ कार्यालयात कार्यरत आहे.

त्यांनी परिवहन आयुक्त ते परिवहन प्रधान सचिवांपर्यंत पत्रव्यवहार करून त्यांची खरी जन्म तारीख १९६५ असल्याचे सांगितले. त्यासंदर्भातील त्यांनी शासनाशी केलेला पत्रव्यवहार केला. जन्म तारखेत दुरूस्ती करण्याची मागणी सुद्धा त्यात केली यासंबंधीत सर्व पत्रव्यवहार सकाळच्या हाती लागला आहे.

त्यानुसार राज्य परिवहन विभागाने १ जानेवारी रोजी काढलेल्या सेवा जेष्ठता यादीत सुद्धा वर्धेकर यांची जन्म तारीख १९६५ लिहीण्यात आली असून, त्यानुसार त्यापुढेच ३० सप्टेंबर रोजी त्यांची सेवा निवृत्तीची तारीख घोषीक केली. मात्र, वर्धेकर अद्यापही परिवहन विभागात कार्यरत आहे.

विशेष म्हणजे मोटर वाहन विभागात संगणकावर होणाऱ्या लॉगिन पासवर्ड वर त्यांचे कामकाज सुरू असून, वर्धेकर सुद्धा अजून एक वर्ष वाढवून घेण्यासाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे समजते.

जन्मतारखेसह आडनावातही घोळ

राजकुमार वर्धेकर (बागडी) यांचे दोन आडनाव आहे. त्याचप्रमाणे सेवा पुस्तकाच्या नोंदीवर जन्मतारखेच्या एक-एक वर्षाच्या फरकाने 2 दोन नोंदी घेतल्याचे समजते. ज्यामध्ये २२ सप्टेंबर १९६५, तर २२ सप्टेंबर १९६६ अशा दोन नोंदी आढळून येत आहे. यापुर्वी वर्धेकर यांनी १९ ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला होता. मात्र, त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी परत घेतला असून, या मागील कारणांचा संबंध मंत्रालयाशी असल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()