Sudan Crisis : सुडानच्या संघर्षात अडकलेल्या वरळीकराची घरवापसी

सुडानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने'ऑपरेशन कावेरी' ही विशेष मोहीम सुरु
sudan conflict opreation kaveri worali people homecoming mumbai
sudan conflict opreation kaveri worali people homecoming mumbaisakal
Updated on

मुंबई : मुंबईतील वरळी परिसरात राहणारे 50 वर्षीय कापड निर्यातदार मोहित अग्रवाल युद्धग्रस्त सुडानमधून घरी परतणारे पहिले भारतीय आणि मुंबईकर ठरले आहे. बुधवारी 26 एप्रिल रोजी रात्री विमानाने मोहित अग्रवाल मुंबईत पोहोचले. वरळी येथे पोहोताच कुटुंबीय, शेजारी आणि मित्रांनी ढोल-ताशांसह त्यांचे जोरदार स्वागत केले. सुडानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने'ऑपरेशन कावेरी' ही विशेष मोहीम सुरु केली आहे.

कामानिमित्त सुडानवारी

9 एप्रिलला कापड व्यापारी मोहित अग्रवाल व्यावसायिक कामानिमित्त सुडानला गेले होते. आपला परतीचा प्रवास एवढा खडतर होईल हे त्यांच्या ध्यानी मानी सुध्दा आले नाही. परंतु सुडानमधील परिस्थिती अचानक बिघडल्यामुळे तेथून पळून जाण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिला नाही.

या कठिण काळात मोहीत यांच्या पत्नी मीनाक्षी अग्रवाल यांनी सुटकेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व काळात मिनाक्षी या भारतीय दूतावासाच्या संपर्कात होत्या. मोहीत आणि भारतीय दूतावासादरम्यान दुआ बनण्याचे काम मिनाक्षी यांनी केले.भारतीय परराष्ट्रीय खात्याने अत्यंत सकारात्मक भूमिका बजावल्याचे मीनाक्षी अग्रवाल यांनी सकाळला सांगितले.

सुटकेचा प्लॅन

सुडानची राजधानी खार्तूमच्या एका हॉटेलमध्ये मोहीम अग्रवाल मुक्कामी होते. या दरम्यान लष्कर आणि निमलष्करी दलामध्ये संघर्ष उडाला. अग्रवाल यांनी सुडानमधील भारतीय दूतावासाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन करत त्यांना सुटकेची योजना सांगितली.

त्याप्रमाणे 24 एप्रिल रोजी सोमवारी मोहित अग्रवाल हॉटेलमधून भारतीय दूतावासाने सांगितलेल्या पिक-अप पॉइंटवर पोहोचले. भारतीय दूतावासाच्या तुकडीसोबत अग्रवाल पोर्ट सुदान या शहरात पोहोचले. पोर्ट सुडानहून मोहित भारतीय युद्धनौका आयएनएस सुमेधा या जहाजावर पोहोचले. लाल समुद्र पार करत सौदी अरेबियाच्या जेद्दा या शहरात सुखरूप पोहोचले. तिथून दुबई गाठले. आणि दुबईवरुन विमानाने ते 26 एप्रिलला मुंबईत परतले. अशा प्रकारे तीन रात्री आणि तीन दिवसांच्या खडतर प्रवासानंतर मोहित अग्रवाल घरी आले.

'ऑपरेशन कावेरी'

भारत सरकारने सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतात आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी' ही विशेष मोहीम राबवली आहे. या अंतर्गत सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये भारतीय वायुसेनेची दोन वाहतूक विमाने तसेच पोर्ट सुडान येथे नौदलाचे आयएनएस सुमेधा हे जहाज तैनात करण्यात आले आहेत. या मोहीमेअंतर्गत सुडानमधून भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे पहिले विशेष विमान बुधवारी रात्री मुंबईत उतरले. दुसरे विमान गुरुवारी दाखल झाले. पहिल्या फ्लाइटमध्ये गुजरातमधील 38 रहिवासी प्रवाशांना मुंबईत आणण्यात आले आहे.

" जेव्हा पहिल्यांदा सुदानमधील परिस्थिती पाहता सर्व कुटुंबीय चिंतेत होते. सुदानमध्ये काय होईल काय नाही याचा नेम नव्हता. अशा परिस्थितीत भारतीय दूतावासाने सकारात्मक भूमिका बजावली. आज ते घरी परतले त्याचा निश्चित आनंद आहे. भारत सरकारचे मी आभार मानते.

- मीनाक्षी अग्रवाल, मोहित अग्रवाल यांच्या पत्नी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.