लंडनची वाघनखं शिवरायांची असल्याचा दावा केला नाही; मुनगंटीवारांच्या निवेदनामुळे मोठा संभ्रम! GR मध्ये वेगळीच माहिती...

Sudhir Mungantiwar on Shivaji Maharaj Wagh Nakh : शासनाने काढलेल्या जीआरमध्ये शिवाजी महाराजांची वाघनखं असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेगळी भूमिका मांडली. यामुळे अधिकच संभ्रम वाढला आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar esakal
Updated on

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा मुद्दा राज्यात चांगलाच चर्चेत आला आहे. लंडनमध्ये असलेली वाघनखं ही शिवाजी महाराजांची आहेत की नाही, याबाबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभेतील निवेदनामुळे संभ्रम वाढला आहे. मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितलं की लंडनची वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत, असा कोणताही दावा केलेला नाही. मात्र, यामुळे शासनाने काढलेल्या जीआरवरुन प्रश्न निर्माण झाला आहे.

जीआरमध्ये विरोधाभास

शासनाने काढलेल्या जीआरमध्ये शिवाजी महाराजांची वाघनखं असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेगळी भूमिका मांडली. यामुळे अधिकच संभ्रम वाढला आहे. मुनगंटीवार म्हणाले की १८७५ मध्ये जी बॉक्स तयार करण्यात आली, ती इतर कोणत्याही वाघनखांसंदर्भात नाही. त्यामुळे हा प्रश्न गैर आहे आणि कोणही इतर वाघनखांसंदर्भात हा दावा केला नाही की ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं आहेत.

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांची प्रतिक्रिया

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी मुनगंटीवारांच्या विधानावर टीका केली आहे. सावंत म्हणाले, "मुनगंटीवार वाघनख्या च्य बाबतीत सभागृहाच्या पटलावर धडधडीत खोटं बोलले. त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा. मुनगंटीवार यांनी कोणतेही पुरावे न देता सभागृहात माहिती दिली आहे. तुमच्याकडे पुरावे नसतील तर नाहीत म्हणून सांगा पण जनतेची फसवणूक करू नका."

जीआर आणि खर्चाचे संदर्भ

सावंतांनी यावर अधिक प्रकाश टाकला की संबंधित वाघनखं शिवाजी महाराजांनीच वापरलेली आहेत असे जीआर यादी सांस्कृतिक विभागाने काढले आहेत. त्यासाठी झालेल्या खर्चाचे जीआर देखील वेळोवेळी निघालेले आहेत. कोल्हापूरमध्ये वाघनखन ठेवण्यासाठी सहा कोटी रुपयांचा खर्चाची तरतूद केल्याचा जीआर आहे. असे असताना वाघनख्यासाठी फारसा खर्च झाला नाही ही चुकीची माहिती आहे. सावंतांनी सरकारने लोकांची दिशाभूल करू नये असेही म्हटले.

Sudhir Mungantiwar
Shivaji Maharaj Wagh Nakh: लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत?; इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा दावा, खरा इतिहास काय?

सरकारवर टीका

सावंतांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, "चुकीची माहिती देणाऱ्या मंत्र्याचं काय करायचं हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावे. हे सरकार तोतया वाघनखं आणत आहेत. मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षालाही माझा आवाहन आहे त्यांनी महाराष्ट्राची घोर फसवणूक होऊ देऊ नये."

महाराष्ट्र सरकारच्या वतीने लंडनमधून आणली जाणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा दावा कोणी केला नाही अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली. पण इंद्रजीत सावंत यांनी त्यांच्या विधानावर तिखट टीका करत त्यांच्यावर खोटी माहिती दिल्याचा आरोप केला आहे. सरकारने आत्तापर्यंत वाघनखे संदर्भात काढलेल्या GR मध्ये शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे असा स्पष्ठ उल्लेख केला आहे, मग मंत्री महोदय डोळे झोपून GR काढतात का? असा सवाल देखील उपस्थितीत केला आहे.

Sudhir Mungantiwar
Ravi Rana: बडनेरातून रवी राणांना पाठिंबाही नको अन् उमेदवारीही! भाजप नेत्यांचा विरोध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com