मुंबईतील धुवाधार पावसाचा कोर्टाला फटका, ऑनलाईन सुनावणी तहकूब...

मुंबईतील धुवाधार पावसाचा कोर्टाला फटका, ऑनलाईन सुनावणी तहकूब...
Updated on

मुंबई : शहर आणि उपनगरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई उच्च न्यायालयातील ऑनलाईन सुनावणीचं काम उद्यापर्यंत उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. दरम्यान, अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या तपासाबाबत दाखल केलेल्या याचिकेवरही बुधवारी सुनावणी होणार आहे.

मुसळधार पाऊस आणि ठिकठिकाणी पाणी साठल्यामुळे मुंबई पुन्हा एकदा संथ झाली आहे. रेल्वे आणि बससेवेवरही याचा परिणाम झाला आहे. या पाश्र्वभूमीवर उच्च न्यायालयात होणाऱ्या पाचही ऑनलाईन खंडपीठांंचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. याबाबतची माहिती अधिकृत सुत्रांनी दिलीआहे. त्यामुळे आज नियोजित सर्व सुनावणी बुधवारी होणार आहेत.

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपासाबाबत दाखल केलेली जनहित याचिकेवरही आता उद्या सुनावणी होणार आहे. मुख्य न्या. दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. याचिकादार समित ठक्कर यांनी याचिका केली असून सीबीआय तपासाची मागणी केली आहे. सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

मुंबईतील पावसाच्या महत्त्वाच्या बातम्या 

sue to heavy rainfall hearing of online court postponed till tomorrow 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.