मुंबई : बालभारतीने प्रसिद्ध केलेल्या इयत्ता आठवीच्या प्रथम भाषा मराठीच्या एका पाठातून स्वातंत्र्यसेनानी सुखदेव यांचे नाव वगळण्यात आले आहे. या पाठात देशासाठी बलिदान देणारे भगतसिंग, राजगुरु आणि कुरबान हुसेन यांच्या नावांचा समावेश असला तरी सुखदेव यांना देशभक्त म्हणून स्थान न दिल्याने बालभारतीच्या या कारभारावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने हे पुस्तक आठवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यास मंजुरी दिली. बालभारतीच्या आठवी प्रथम भाषा पुस्तकात दुसऱ्या क्रमांकाचा पाठ "माझ्या देशावर माझे प्रेम आहे." समाविष्ट करण्यात आला आहे. हा पाठ प्रसिध्द लेखक यदुनाथ थत्ते यांच्या "प्रतिज्ञा" या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या पाठात भगतसिंग, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. असा उल्लेख आहे. मात्र देशभक्तांच्या या नावांमधून सुखदेव यांचे नाव वगळण्यात आले आहे.
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये 23 मार्च 1931 रोजी फासावर चढवण्यात आले. इतिहासामध्ये या तिन्ही स्वातंत्र्य सेनानींचा उल्लेख एकत्रितपणे करण्यात येतो. पपरंतु या पुस्तकात सुखदेव यांचा उल्लेख नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
या विषयी बालभारतीच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधल्यानंतरही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
--------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.