उल्हासनगर : गोव्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत उल्हासनगरातील सुमित पांडे हा तरुण तब्बल दीड हजार स्पर्धकात अव्वल ठरला असून तो सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे.विशेष म्हणजे यासाठी(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी पाठबळ दिल्याने सुवर्ण पदक पटकावल्याची कबूली सुमितने दिली असून कबूलीची ही पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.