मुंबई: गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (ex-Mumbai Police Commissione Param Bir Singh) यांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा संरक्षण दिलं आहे. संरक्षण न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलेलं अंतरिम संरक्षण आज बुधवारी वाढवलंय. न्यायमूर्ती एसके कौल आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने निर्णय देताना म्हटलंय की, हा अंतरिम आदेश २४ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. (Supreme Court)
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला परम बीर सिंह यांच्याविरुद्ध असलेल्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सुरू असलेला तपास पूर्णपणे थांबवण्याचे निर्देश दिले होते. सिंग यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर सीबीआयकडे सोपवायचे की नाही यावर आम्ही निर्णय घेऊ, असं सर्वोच्च न्यायलयानं म्हटलं होतं. तसेच राज्य सरकारला या प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत दोन हात दूर राहण्यास सांगितले होतं. न्यायालयाच्या या आदेशानुसार, राज्य सरकारनेही हे प्रकरण स्थगित ठेवण्याचं आश्वासन दिल्याचं न्यायालयाने म्हटलं होतं.
याआधीच माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात सध्यातरी कुठलीही चार्जशीट दाखल न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे परमबीर सिंह यांना तेंव्हाही दिलासा मिळाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.