लोकसभेला या मतदारसंघात तुतारीच वाजली, त्यामुळे आता विधिमंडळात राज्यात परिवर्तन होऊन महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराविरोधात महाविकास आघाडीची तुतारी वाजणार असल्याचे, प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. मुरबाड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या प्रचारार्थ गुरुवारी बदलापुरातील सभेत त्यांनी महायुतीला लक्ष्य केले.