Dombivli MIDC Blast : डोंबिवली दुर्घटनेत अधिकारी दोषी असतील तर...; कामगार मंत्र्यांची ग्वाही

सोमवारी राज्याचे कामगार मंत्री खाडे यांनी डोंबिवली एमआयडीसीतील दुर्घटनेच्या ठिकाणी येत पाहणी केली.
Suresh Khade said Action will be taken if the officials are guilty in Dombivli MIDC Blast accident
Suresh Khade said Action will be taken if the officials are guilty in Dombivli MIDC Blast accident
Updated on

डोंबिवली, ता. 27 - दर दोन वर्षांनी कंपन्यांचे सर्व्हेक्षण केले जाते. तिथे योग्य खबरदारी घेतली जाते की नाही. त्यांना काही त्रुटी असतील तर त्या सांगितल्या जातात. त्या पूर्ण केल्या नाही तर कारवाई देखील करतो. डोंबिवली मधील दुर्घटनेत कोणी अधिकारी दोषी असतील. कामात काही हलगर्जीपणा केला गेला असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली.

सोमवारी राज्याचे कामगार मंत्री खाडे यांनी डोंबिवली एमआयडीसीतील दुर्घटनेच्या ठिकाणी येत पाहणी केली. घटनेचा आढावा घेतल्यानंतर खाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता वरील माहिती दिली. मंत्री खाडे म्हणाले, कामगार विभागाच्या सूचना पक्क्या असतात. तुम्हाला काय करायचे काय नाही. दोन वर्षातून कंपन्यांचे सर्वेक्षण केले जाते. या कंपनीचे सेफ्टी ऑडिट झालेल असून त्याची पूर्ण माहिती घेऊन जे दोषी असेल त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल.

Suresh Khade said Action will be taken if the officials are guilty in Dombivli MIDC Blast accident
Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोटातील मृतांच्या आकडेवारीवरून गोंधळ; दुर्घटनेत आतापर्यंत किती कामगारांचा मृत्यू?

डोंबिवली दुर्घटनेत जखमी 68 पैकी 8 लोक यांच्यावर अजून उपचार सुरू आहेत. रिऍक्टर मुळे हा स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी माहिती आहे. त्याची चौकशी सुरू आहे. लेबर डिपार्टमेंट कडून कामगारांची सर्व माहिती घेऊन लेबर कोर्ट मध्ये ती मांडली जाईल. आणि त्यानुसार त्यांना सोयी सुविधा, मोबदला दिला जाईल असे ही त्यांनी सांगितले.

Suresh Khade said Action will be taken if the officials are guilty in Dombivli MIDC Blast accident
Dombivli Blast: "माझ्या पत्नीचा मृतदेह तिच्या अंगठीने ओळखला"; डोंबिवली स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या रिद्धीच्या पतीचा दुःखद अनुभव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.