Suryakanta Patil: नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का! सूर्यकांता पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

नांदेडमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना सोबत घेऊन भाजपनं लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी खेळी केली असली तरी आता तिच खेळी भाजपवर उलटली आहे.
Suryakanta Patil
Suryakanta Patil
Updated on

मुंबई : नांदेडमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना सोबत घेऊन भाजपनं लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी खेळी केली असली तरी आता तिच खेळी भाजपवर उलटली आहे. कारण भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. (Suryakanta Patil enters to NCP Sharad Pawar big blow to BJP in Nanded)

Suryakanta Patil
Lok Sabha Speaker: भाजपकडून लोकसभा अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब! ओम प्रकाश बिर्लांनी भरला नामांकन अर्ज

गेल्याकाही दिवसांपासून सूर्यकांता पाटील या भाजपत नाराज होत्या. त्यामुळं त्यांनी काल भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यामागचं कारण सांगताना त्यांनी म्हटलं की, मी गेल्या दहा वर्षात खूप काही शिकले, त्यासाठी मी पक्षाची आभारी आहे. सूर्यकांता पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून भाजपकडं उमेदवारी मागितली होती. तिकीट न मिळाल्यानं त्यांनी सोशल मीडियातून जाहीर नाराजी व्यक्ते केली होती. त्यानंतर अखेर काल भाजपचा राजीनामा देत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Suryakanta Patil
Factory Shutdown: 1947मध्ये सुरू झालेला ऐतिहासिक कारखाना होणार बंद; सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली VRS, काय आहे कारण?

सूर्यकांता पाटील या चार वेळा खासदार राहिल्या आहेत. तसंच एकदा त्या आमदारही राहिल्या आहेत. त्यांनी हिंगोली-नांदेडचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ग्रामीण विकास मंत्रालयात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. त्यानंतर संसदीय कार्य मंत्रालयात राज्यमंत्रीपद देखील सांभाळलं आहे. राजकीय करियरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ८ वर्षे नांदेड महापालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहिलं आहे.

१९९१ मध्ये त्यांनी काँग्रेसकडून नांदेड लोकसभा जिंकली होती. तर १९९९ मध्ये त्या राष्ट्रवादीत दाखल झाल्या होत्या. २०१४ मध्ये हिंगोलीतून काँग्रेसनं राजीव सातव यांना तिकीट दिल्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.