मुंबईः सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सीबीआयनं अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणातील प्रत्येक साक्षीदाराची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सीबीआय मुंबईत या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. या प्रकरणा संदर्भातले लेटेस्ट अपडेट्स जाणून घेऊया.
आता सीबीआय अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता असून तिला नोटीस पाठवण्यात येणार असल्याचंही बोलंलं जात आहे. रिया सध्या मुंबईतच राहत आहे.
सीबीआयनं सुशांतचा रुममेट आणि मित्र सिद्धार्थ पिठाणीची चौकशी केली. यात सुशांतच्या घरातील घडामोडी ते अगदी रियोसोबतचे सुशांतचे नातं या आणि अशा मुद्द्यावर चौकशी केली. सिद्धार्थ पिठाणी हा सुशांतचा मित्र होता आणि सुशांतसोबत फ्लॅटमध्येही राहायचा. ज्यादिवशी सुशांतचा मृत्यू झाला त्यादिवशीही सिद्धार्थ फ्लॅटमध्येच होता. शनिवारी सिद्धार्थची १० तास चौकशी झाली.
सीबीआयनं सिद्धार्थला पहिला प्रश्न विचारला, ‘तू कधीपासून सुशांतला ओळखतो? या प्रश्नावर सिद्धार्थनं सांगितलं की, मी एप्रिल 2019 पासून सुशांतचा रुममेट आहे. रिया चक्रवर्तीनं का आणि कधी घर सोडलं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सिद्धार्ध म्हटला, “रियानं 8 जूनला घर सोडलं. मात्र तिनं का घर सोडले हे माहिती नाही. तिनं जाताना मला सुशांतची काळजी घे. मी फक्त एका कॉलच्याच अंतरावर आहे. त्यामुळं काही अडचण झाल्यास फोन कर एवढंच सांगितलं. सुशांत आणि रियामध्ये काही वाद होते का असा प्रश्न सीबीआयनं सिद्धार्थला विचारला. यावर सिध्दार्थ म्हणाला, मला माहिती नाही.
तिसऱ्यांदा सीबीआयने कूक नीरजची चौकशी केली आहे. शुक्रवारी नीरजची सीबीआयनं दहा तास चौकशी केली. शनिवारी म्हणजेच 22 ऑगस्टला साडे दहा तास चौकशी केली. त्यानंतर पुन्हा नीरजची चौकशी करण्यात आली. दोन दिवस सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी नीरजकडून स्वतंत्रपणे चौकशी करत सुशांत आणि त्याच्या घरी कोण कोण येत होतं, याची माहिती घेतली. मात्र आता नीरजला सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीसोबत बसवून एकत्र चौकशी केली.
सुशांत सरांनी मृत्यूआधी 3 दिवस गांजाचं सेवन केलं होतं. पार्ट्यांमध्येही सुशांत सर गांजाचं सेवन करायचे, असं नीरजने म्हटलं आहे. सुशांत आठवड्यातून एक-दोन वेळा तरी घरी पार्टी करायचा. या पार्टीत रिया, आयुष असायचे आणि बऱ्याच वेळा या पार्टीत ते दारू, गांजा, सिगारेट ओढायचे. तसंच सॅम्युअल जेकब सुशांतसाठी गांजाचा रोल तयार करुन द्यायचे. कधी-कधी मीदेखील तयार करुन द्यायचो . इतकंच नाही तर सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी तीन दिवस आधी गांजाचे रोल केले होते. हे रोल तो कायम घरात असलेल्या जिन्याच्या खालच्या कपाटात ठेवत असते. त्यामुळे सुशांतचं निधन झाल्याचं लक्षात येताच प्रथम मी कपाटातील गांजाचा बॉक्स पाहिला. मात्र त्यातले सगळे रोल संपले होतं, असं नीरज सीबीआयला चौकशी दरम्यान सांगितलं आहे.
सीबीआयनं रविवारी दुपारनंतर सुशांतच्या फ्लॅटवर जाऊन क्राइम सीन रिक्रिएट केला. सुशांतच्या बंद रूमचे लॉक तोडणाऱ्या रफिक चावीवाल्याचाही रविवारी जबाब नोंदवण्यात आला. यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सिद्धार्थलाही सोबतच ठेवलं होतं. सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी सिद्धार्थ फ्लॅटमध्येच असल्यानं त्या दिवशी काय काय झालं? याची पूर्ण माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घेतली.
Sushant Singh Rajput case Live Updates not received cbi Summons riya chakraborty
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.