सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणः सुशांतची बहिण मीतू सिंग ईडी कार्यालयात

सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणः सुशांतची बहिण मीतू सिंग ईडी कार्यालयात
Updated on



मुंबई ः आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सक्त वसुली संचलनालयाने(ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यांप्रकरणी सुशांत सिंगची बहिण मीतू सिंगने मंगळवारी ईडी कार्यालयाला भेट दिली. मीतू ही सिंग कुटुंबातील पहिलीच सदस्य आहे, जीचा जबाब याप्रकरणी ईडीने याप्रकरणी नोंदवला आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांनी मीतूला जबाब नोंदवण्यासाठी पाच वेळा बोलवले होते. पण तिने आतापर्यंत मुंबई पोलिसांकडे याप्रकरणी आतापर्यंत तरी जबाब नोंदवलेला नाही.

सुशांत सिंग व रिया चक्रवर्ती यांच्यातील आर्थिक व्यवहारांबाबत माहिती घेण्यासाठी ईडीने मीतूला बोलावले होते. 14 जूनला सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वात पहिला घरी पोहोचणारी ती कुटुंबातील पहिली सदस्य होती. त्यावेळी मुंबई पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा केला. त्यावेळीही मीतू तेथे उपस्थित होती. याशिवाय सुशांतच्या लोणावळा येथील घरीही मुंबई पोलिसांसोबत ती गेली होती. हा बंगला सुशांत भाडेतत्त्वावर देत होता. यापुर्वी मीतूने किमान पाच वेळा मुंबई पोलिसापुढे जबाब नोंदवण्याची विनंती अमान्य केली आहे. याप्रकरणी सुशांतचे वडील के.के. सिंग यांनी बिहार पोलिसांकडे रिया विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी मीतूने बिहार पोलिसांना जबाब दिला आहे. मितू शिवाय याप्रकरणी मंगळवारी सुशांतची माजी व्यवस्थापक व रियाची व्यवस्थापक म्हणून सध्या काम पाहणारी श्रुती मोदी तसेच सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानी यांची चौकशी केली. यापूर्वी या दोघांचीही दोन वेळा ईडीने चौकशी केली आहे.

ईडीचा तपास सध्या रियाची मालमत्ता, खर्च, गुंतवणूक, व्यवसाय व व्यावसायिक करार यांच्या भोवती सुरू आहे. विशेष करून खार व नवी मुंबईतील मालमत्ता येथील मालमत्ता, तसे रिया व सुशांतने एकत्र केलेले व्यवहार याबाबत ईडी तपास करत आहे. याशिवाय रियाचे फोन व व्हॉट्स अॅपवरील संभाषण याचीही पडताळणी सुरू आहे. याशिवाय सुशांत व रियामधील संभाषण, तसेच डीलीट करण्यात आलेलेल संदेश यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. रियाला याप्रकरणी समन्स पाठवल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याचे कारण पुढे करून तिने चौकशीस न करण्याची मागणी केली होती. ती ईडीने फेटाळल्यानंतर शुक्रवारी व त्यानंतर सोमवारी ईडीने रिया चक्रवर्तीची चौकशी केली. रियाचे खर्च व तिने दाखवलेली मिळकत यात ताळमेळ नसून ईडी त्यावरही तपास करत आहे. चौकशी दरम्यान रियाने 84 लाखात खार येथील फ्लॅट घेतला असून त्यासाठी 60 लाखांचे गृहकर्ज घेतल्याचे ईडीला सांगितले आहे. उर्वरीत सर्व रक्कम तिने भरली असून सर्व व्यवहार धनादेशाद्वारे केला असल्याचे तिने ईडीला सांगितले आहे. याशिवाय रिया, तिचा भाऊ शौविक व सुशांतने नवी मुंबईत सुरू केलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँडरीग झाले आहे का, याबाबतही ईडीचा तपास सुरू आहे. चौकशी दरम्यान रियाने आपण कोणतीही मनी लाँडरीग केली नसल्याचे ईडीला सांगितले आहे.

सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी सुशांत सिंह गर्लफ्रेंड व अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये त्यांनी रियाने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेली असे म्हटले आहे. तसेच सुशांतच्या खात्यामधील15 कोटी रुपये देखील रियाने काढले असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी आत्महत्येक प्रवृत्त केल्याचा गुन्हा बिहार पोलिसांनी दाखल केल्यानंतर याप्रकरणी मुंबईत तपासाला सुरूवात केली.  त्यानंतर आता ईडीनेही याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सध्या बिहार पोलिसांकडील प्रकरण सीबीआला वर्ग करण्यात आले आहे

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.