सुशांतच्या मृत्यूच्या आधी एक आठवडा काय घडलं? कामगाराने सांगितला घटनाक्रम

sushant rhea
sushant rhea
Updated on

मुंबई - सुशांतच्या घरी काम करणाऱ्या नीरजने पोलिसांना दिलेल्या जबाबात 8 जूनपासून 14 जूनपर्यंत काय घडलं ते सांगितलं आहे. यामध्ये 8 जूनला रिया घरातून गेली आणि त्यानंतर काय झालं इथं पासून ते सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह खाली उतरवला इथंपर्यंतची माहिती नीरजने पोलिसांना दिली आहे. सध्या सीबीआय़ या प्रकरणाचा तपास करत असून नीरजसह सिद्धार्थ पिठानी याची चौकशी केली जात आहे. 

8 जून -
नीरजने जबाबात म्हटलं की, 8 जूनला केशवनं सर्वांना जेवण तयार केल्यानंतर जेवणाची तयारी करत असतानाच रियाने तिची बॅग पॅक करायला सांगितलं. रिया तेव्हा रागात दिसत होती. बॅग पॅक करताना दुसऱ्या एका कपाटातील कपडे नंतर घेऊन जाईन असं सांगितलं. रिया तिच्या भावासोबत न जेवताच निघून गेली. त्यावेळी सुशांत सर पूर्णवेळ खोलीतच बसून होते. त्याच दिवशी सुशांतची बहिण मीतू घरी आल्याचंही नीरजने सांगितलं. 

12 जून - 
सुशांतची बहिण चार दिवस तिथेच होती. 12 जूनला जाताना दोन तीन दिवसांनी परत येईन असा निरोप तिने नीरजला दिला. तसंच सुशांतची काळजी घेण्यासही सांगितलं. सुशांत बहिणीसोबत जेवत होता. बहिण घरातून गेल्यानंतर सुशांत टेरेसवर गेला होता. 

13 जून -
मृत्यूच्या आदल्या दिवशी सुशांत सकाळी 9 पर्यंत रुममध्येच होता. तेव्हा स्वच्छता करायला गेलेल्या नीरजला त्याने नंतर येण्यास सांगितलं. दुपारी खिचडी केली होती ती खाल्ली. त्यानंतर सुशांत सांयकाळी रुममधून बाहेर येऊन टेरेसवर गेला. काही वेळाने खाली आला पण जेवण न करता केवळ मँगो शेक पिऊन झोपला असं नीरजने म्हटलं आहे. 

14 जून -
सुशांतचा मृत्यू झाला त्या दिवशी सकाळपासून ते मृतदेह उतरवल्यानंतर पोलिस येईपर्यंतच्या सर्व घडामोडी नीरजने सांगितल्या आहेत. सकाळी 8 च्या सुमारास घरात स्वच्छता करत असताना सुशांत रूममधून बाहेर आला आणि थंड पाणी मागितलं. पाणी प्यायल्यानंतर हसून हॉल स्वच्छ आहे का असं विचारलं आणि गेला. त्यानंतर जवळपास साडे नऊ वाजता हॉल स्वच्छ करत असताना केशवने केळी, नारळ पाणी आणि ज्यूस सुशांतच्या रूममध्ये नेलं पण त्यातलं फक्त नारळ पाणी आणि ज्यूस सुशांत प्यायला. 

केशव पुन्हा साडेदहा वाजता जेवण काय करायचं हे विचारायला गेला तेव्हा दरवाजा वाजवला. पण काहीच उत्तर मिळालं नाही. तेव्हा सुशांत झोपला असेल असं समजून खाली आला आणि त्यानं ही माहिती दीपेश आणि सिद्धार्थला माहिती दिली. त्यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला पण आतून आवाज आला नाही आणि दरवाजासुद्धा उघडला नाही. शेवटी सिद्धार्थने सुशांतच्या फोनवर कॉल केला पण त्यालासुद्धा काहीच उत्तर देत नव्हता. रुमच्या चाव्या शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला पण त्या सापडल्या नाहीत असं नीरजने म्हटलं आहे. 

सुशांतच्या रुमचा दरवाजा उघडण्यासाठी चाव्यांची शोधाशोध झाल्यानंतर त्याच्या बहिणीला कॉल केला. तेव्हा तिने दरवाजा उघडा मी वाटेत आहे, पोहोचेन थोड्या वेळात असं सांगितलं. तोपर्यंत सिद्धार्थने चावीवाल्याला बोलावलं होतं. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन चावीवाले आले. त्यांनी दरावाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना वेळ लागत होता. सिद्धार्थने त्यांना लॉक तोडण्यास सांगितलं. दरवाजाचं लॉक तोडताच सिद्धार्थनं चावीवाल्यांना खाली पाठवलं. दीपेशनं त्यांना 2 हजार रुपये दिले आणि ते गेले. दीपेश वरती आल्यावर आम्ही दरवाजा उघडला असं नीरजने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.

दरवाजा उघडल्यानंतर काय पाहिलं याची माहिती नीरजने पोलिसांना दिली. नीरज म्हणाला की, रुममध्ये अंधार होता आणि एसी सुरू होता. दीपेशने लाइट सुरु केल्यानंतर सिद्धार्थ दरवाजातून पुढे गेला आणि लगेच बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ मी आणि दीपेश सुद्धा आत गेलो. सिलिंग फॅनला लटकलेल्या सुशांतचा चेहरा खिडकीच्या दिशेनं होतं. हे पाहून घाबरलो आणि रुममधून बाहेर आलो. सिद्धार्थने सुसांतच्या बहिणीला फोन केला आणि त्याची माहिती दिली. त्यानंतर सिद्धार्थने मला चाकूने गळ्याला असलेलं कापड कापायला सांगितलं. ते कापल्यानंतर मृतदेह खाली घेतला आणि बेडवर ठेवला. तोपर्यंत सुशांतची बहिण रुममध्ये पोहोचली होती. 

सुशांतची बहिण मीतू रुममध्ये आल्यावर किंचाळत होती. गुलशन तु हे काय केलंस असं ओरडत होती. त्यानंतर तिघांनी त्याचा मृतदेह बेडवर ठेवला. त्याच्या गळ्यातील शर्ट काढून बाजुला ठेवल्यानंतर सिद्धार्थने सुशांतच्या छातीला पंप करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी सिद्धार्थने फोन केल्यानंतर पोलिस पोहोचले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()