मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दाखल केलेली फौजदारी फिर्याद रद्द करण्यासाठी आता अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वैद्यकीय तपासणी शिवाय सुशांतला बंदी घातलेले औषध बहिणी देत होत्या, अशी फिर्याद रियाने केली आहे.
वांद्रे पोलिस ठाण्यात सुशांतची गर्लफ्रेंड असलेल्या रियाने त्याची बहिण प्रियंका आणि मितू सिंह विरोधात तक्रार नोंदविली आहे. रिया सध्या कारागृहात असून एनसीबी याप्रकरणी अंमलीपदार्थांचा वापराबाबत तपास करीत आहे. रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून हे उघड झाले आहे की प्रियांकाने दिल्लीतील डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टर तरुण कुमार यांच्याकडून सुशांतसाठी औषधे घेतली होती. ही औषधे एनडीपीएस कायद्यानुसार प्रतिबंधित आहेत. सुशांतच्या मृत्युसाठी ही औषधे कारणीभूत ठरल्याचा दावा तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. तसेच यासाठी वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाही, असेही रियाचे म्हणणे आहे.
या तक्रारीमध्ये प्रियांका आणि मितूविरोधात आरोप केले आहेत. त्यामुळे तक्रार रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याप्रकरणी आम्हाला नाहक गुंतविले आहे, असा दावा दोघांनी केला आहे. याचिकेवर न्या एस एस शिंदे यांच्या खंडपीठापुढे आज होण्याची शक्यता आहे. सुशांतचा मृत्यू आत्महत्येने झाला असून सीबीआय या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
---------------------------
(संपादनः पूजा विचारे)
Sushant Singh Rajput sister in Mumbai High Court
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.