तंत्रमंत्र, जादुटोणा बुवाबाजी करुन सर्वसामान्यांची फसवणुक करणारा भामटा जेरबंद

पाच वर्षापासून बुवाजाजी करुन शेकडो लोकांची आर्थिक फसवणुक केल्याचा संशय
mumbai
mumbaisakal
Updated on

नवी मुंबई : तंत्रमंत्र, जादुटोणा व स्मशानपुजा करुन सर्व काही सुरळीत करुन देण्याचा बहाणा करुन सर्वसामान्य नागरिकांकडून रोख रक्कम उकळून त्यांची फसवणुक करणाऱया भामटयाला वाशी पोलिसांनी (Police) अटक केली आहे. राजाराम शिंदे (Rajaram Shinde) असे या भामटयाचे नाव असून त्याने वाशी (Vashi) सारख्या भागात मागील ५ वर्षापासून हा बुवाबाजीचा धंदा सुरु केल्याचे तपासात आढळुन आले आहे. या पाच वर्षामध्ये त्याने तंत्रमंत्र, जादुटोणा व स्माशानपुजेच्या नावाखाली शेकडो लोकांची (people) फसवणुक केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडून (Police) बुवाबाजी करणाऱया या भामटयााची कसुन चौकशी करण्यात येत आहे.

या प्रकरणात फसवणुक झालेली ३६ वर्षीय महिला वाशीतील व तीची फसवणुक करणारा आरोपी राजाराम शिंदे हे दोघेही वाशीतील जुहूगावात रहाण्यास आहेत. तक्रारदार महिलेच्या पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर सासर कडील लोकांनी तीला जवळ न केल्याने या महिलेसमोर अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे सदर महिला सतत तणावग्रस्त रहात होती. त्यामुळे तीच्या घरी धुणीभांडी करण्यासाठी येणाऱया महिलेने त्यांच्या बिल्डींगमध्ये भगत रहाण्यास असल्याचे व तो मंत्राद्वारे दु:ख दुर करत असल्याचे सांगितले. तसेच त्यांना एकवेळ बाबाकडे जाण्याचा सल्ला दिला. मोलकरणीच्या सांगण्यावरुन सदर महिला गत मार्च महिन्यामध्ये जुहूगाव येथील आनंद भवन इमारतीत राहणाऱया आरोपी राजाराम शिंदे या बाबाच्या घरी गेली होती.

mumbai
आजारपणाला कंटाळून महिलेने चिरला स्वतःचा गळा

त्यावेळी सदर महिलेने तीच्या सर्व समस्या भामटया राजाराम शिंदे याला सांगितल्यानंतर त्याने सदर महिलेवर करणी केल्याचे व तीच्यावर भुतपिशाच्याचे सावट असल्याचे सांगून तीच्या सर्व अडचणी दुर करण्याचे व अडकलेले सर्व रस्ते खोलणार असल्याचे तीला सांगितले. त्यासाठी स्मशान पुजा करत असल्याचे सांगुन तंत्रमंत्र करुन एक ताईत सदर महिलेला दिला. तसेच सात लिंबु देऊन ते दोन दिवसात खाण्यासाठी दिले. त्यानंतर काही दिवसातच भामटया राजाराम शिंदे याने सदर महिलेचे घर गाठून त्यांच्याकडुन स्मशान पुजेच्या नावाने प्रथम २० हजार रुपये व त्यानंतर ३० आणि २० हजार असे एकुण ७० हजार रुपये उकळले. मात्र त्यानंतर देखील या महिलेच्या मनातील नैराष्य कमी झाले नाही.

त्यानंतर सदर महिला दोन-तीन वेळा या बाबच्या घरी गेली असता त्याने तीच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. या बाबाने सांगितल्याप्रमाणे सदर महिलेने सर्व केल्यानंतर देखील तीच्या समस्येत वाढ होत राहिल्याने या महिलेने त्याला पैसे देणे बंद केले. त्यामुळे भामटया बाबाने सदर महिलेला वारंवार फोन करुन, पुजेसाठी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भामटया राजाराम शिंदे याच्याकडुन फसवणुक होत असल्याची खात्री पटल्यानंतर या महिलेने आपल्या सहकारी महिलेच्या मदतीने बुवाबाजी करणाऱया या बाबाच्या कारनाम्यांचे व्हिडीओ रेकॉर्डींग करुन त्याच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तत्काळ भामटया राजाराम शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

mumbai
‘संवर्धित शेती’चे उपयुक्त तंत्र

या आरोपी विरोधात फसवणुकिसह, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याची बुधवार पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक योगेश परदेशी यांनी दिली.

या प्रकरणातील बुवाबाजी करणारा आरोपी राजाराम शिंदे हा पुर्वी रिक्षा चालवत होता. त्यानंतर पाच वर्षापुर्वी त्याने दैवी शक्ती प्राप्त झाल्याचे भासवून आपल्या घरातून बुवाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर या बाबाकडे समस्याग्रस्त लोकांची एकच रीघ लागली. मागील पाच वर्षामध्ये या भामटयाने आपल्या बुवाबाजीच्या माध्यमातून जादुटोणा, तंत्रमंत्र व स्मशान पुजा करण्याचा बहाणा करुन अडचणीत असलेल्या समस्याग्रस्त शेकडो लोकांची आर्थिक फसवणुक केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

  • बाबा करणी करेल या भितीने तक्रार करण्यास नागरिकांचा नकार

तंत्रमंत्राच्या सहाय्याने बुवाबाजी करुन सर्वसामान्य लोकांची आर्थिक फसवणुक करणाऱया भामटया राजाराम शिंदे याच्याकडून फसवणुक झालेल्या एका महिलने तक्रार दाखल केली असली तरी, या बाबा विरोधात तक्रार केल्यास तो आपल्यावर करणी करेल, अशी भीती अनेक लोकांच्या मनामध्ये तयार झाली आहे. त्यामुळे या बाबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी इतर कुणीही पुढे येत नसल्याचे पोलिसांना आढळुन आले आहे. त्यामुळे या बाबा विरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांनी निर्भिडपणे पुढे यावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.