Mumbai News : 'स्वराज्य भूमी'वरून भाजपात श्रेय वादाची लढाई! लोढा विरूध्द खासदार शेट्टी

गिरगाव चौपाटी येथे 'स्वराज्य भूमी' विकसित करण्यावरून खासदार गोपाळ शेट्टी आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
mangalprabhat lodha and gopal shetty
mangalprabhat lodha and gopal shettysakal
Updated on

मुंबई - गिरगाव चौपाटी येथे 'स्वराज्य भूमी' विकसित करण्यावरून खासदार गोपाळ शेट्टी आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. मंत्री लोढा यांचा स्वराज्यभूमीच्या विकास कामात हस्तक्षेप वाढल्यामुळे खासदार शेट्टी यांची नाराजी वाढली आहे. त्यामुळे खासदार विरूद्ध मंत्री असे चित्र निर्माण झाले आहे.

कोविडच्या काळात वर्षाच्या काळात स्वराज्य भूमीच्या विकास कामात कोणतीही प्रगत झाली नाही. लोकमान्य टिळकांचे विचार आणि त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेले योगदान अनंत काळापर्यंत आणि विशेष करून नवीन पिढीच्या स्मरणात राहण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ गिरगांव चौपाटी भूमी 'स्वराज्य भूमी' म्हणून विकसित करून देण्याची आवश्यकता असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात खासदार शेट्टी यांनी व्यक्त केले होते.

उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत खासदार शेट्टी यांनी स्वराज्य भूमीची प्रतिकृती दाखविली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार शेट्टी यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या बरोबर बैठक घेवून सर्व विषयांबाबत चर्चा होवून अंतिम निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती खासदार शेट्टी यांनी दिली.

गिरगाव चौपाटी येथे स्वराज्य भूमी विकसित करण्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी हे २०१२ पासून प्रयत्नशील आहेत. त्यांनी २०१९ पर्यंत सातत्याने पाठपुरावा केला होता. स्वराज्य भूमीची मागणी आपण ४ ऑगस्ट २०१२ साली मुंबईचे तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांना पत्राद्वारे केली होती.

गिरगाव चौपाटीवर विकसित करण्यात येणा-या स्वराज्य भूमीचे श्रेय खासदार शेट्टी यांना जात असल्याचे लक्षात येताच उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या कामात हस्तक्षेप करणे सुरू केले आहे. लोढा हे मलबार हिल विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत. त्यांच्यामुळे मतदार संघात गिरगार चौपाटी येते.

त्यामुळे उत्तर मुंबईतील खासदार आपल्या मतदार संघात स्वराज्य भूमी विकसित करीत असल्याने, याचे श्रेय मिळविण्यासाठी लोढा यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करीत असल्याचे समजते. त्यामुळे खासदार शेट्टी हे कमालीची नाराज झाले आहेत. त्यांनी पालिकेच्या सहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांना पक्ष पाठवून आपली नाराजी कळविली आहे.

अंग काढून घेतो

स्वराज्य भूमीच्या विकास प्रकल्पातून मी अंग काढून घेत आहे असे पत्र सहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांना पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून, हे काम आपण पुढे नेवूया.

- खासदार गोपाळ शेट्टी,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.