ठाणे : कोरोनाची वाढती रुग्णसंख्यमुळे खासगी रुग्णालये आणि शासकीय रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी जागा शिल्लक राहिल्या नाहीत. त्यामुळे सरकारने कोव्हिडची गंभीर लक्षणे नसलेल्या रुग्णांना खासगी हॉटेलमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू केले होते. मात्र रुग्णांना या हॉटेलचे बील परवडेनासे झाले आहे. कोविडच्या उपचारासाठी नियुक्त करण्यात आलेले शहरातील खासगी हॉटेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. त्याची दखल घेऊन महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी हॉस्पिटलच्या दराबरोबरच हॉटेलच्या दरावर नियंत्रण आणले आहे. जास्त दर घेण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांच्या वर कारवाई केली जाणार आहे.
गेल्या काही महिन्यात क्वारंटाईन करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या हॉटेलचे दरही या हॉस्पिटलच्या दराबरोबर स्पर्धा करणारे ठरले होते. या हॉटेलमध्ये राहण्यासाठीही एक रुग्णाला एक लाख रुपये मोजावे लागण्याची वेळ आली असल्याची चर्चा होती. कोरोनाची लक्षणे दिसत नसतांनाही ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल त्यांच्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून हॉटेलची व्यवस्था करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये डॉक्टर उपलब्ध करुन देऊन उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या हॉटेलमध्ये राहण्याचे एक दिवसाचे भाडे ऐकूणच सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ येत होती.
ठाणे महापालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या घडीला साडेपाच हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपाचारासांठी विविध रुग्णालयात दाखल आहेत. त्यात ज्या रुग्णांना कोरोनाचा जास्त त्रस होत नसेल आणि ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणो आढळत नसतील, अशा रुग्णांवर शहरातील हॉटेलमध्ये उपचार सुरु झाले आहेत.
- दर निश्चित
यापैकी काही हॉटेलचे दर दिवसाला चार ते पाच हजार आकारले जात होते. मात्र आता या हॉटेलचे दर दिवसाला कमाल दोन हजार निश्चित करण्यात आले आहेत. तसे आदेश डॉ विपिन शर्मा यांनी दिले आहेत. जिंजर, लिरीडा, शरणम, बाईक आदी हॉटेलमध्ये दोन हजार भाडे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये रूग्णांना जेवण नाश्ता आदी द्यावे लागणार आहे. आयुक्तांच्या या आदेशामुळे मनमानी दर आकारत असलेल्या हॉटेल व्यवस्थापनाला दणका बसल्याचे मानले जात आहे.
(संपादन : वैभव गाटे)
the swindling of patients by hotels will stop action warning from municipality
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.