'ताज हॉटेलवर हल्ला होणार आहे'; १४ वर्षीय मुलाच्या कॉलने खळबळ

'ताज हॉटेलवर हल्ला होणारे...'; १४ वर्षांच्या मुलाचा फोनने खळबळ Taj Hotel Mumbai is in Danger Hoax call from 14 years Old boy left everybody stunned दोन AK-47 बंदूकधारी मास्क घालून त्या गेटने येतील असंही मुलाने सांगितलं
taj hotel
taj hotel
Updated on

दोन AK-47 बंदूकधारी मास्क घालून त्या गेटने येतील असंही मुलाने सांगितलं

मुंबई: महाराष्ट्रासाठी शनिवारचा दिवस हा अनेक घडामोडींचा होता. सुरूवातीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी समन्समुळे खळबळ माजली होती. त्यानंतर भाजपने ओबीसी पदोन्नती आरक्षणावरून जोरदार आंदोलने करून दिवस गाजवला. त्यातून मुंबई शांत होत असतानाच दुपारच्या सुमारास ताज हॉटेलवर हल्ला होणार असल्याच्या कॉलने साऱ्यांना भययुक्त केले. पोलिसांनी नीट चौकशी व तपास केल्यावर हा केवळ अफवेचा कॉल असल्याचे समोर आले, पण अवघ्या १४ वर्षांच्या मुलाने हा कॉल का केला असावा? याचा उलगडा पोलिस करण्याचा प्रयत्न करत आहेत. (Taj Hotel Mumbai is in Danger Hoax call from 14 years Old boy left everybody stunned)

taj hotel
अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात येणार नाहीत; वकिलाची माहिती

शनिवारी दुपारच्या सुमारास ताज हॉटेलच्या व्यवस्थापनाला लँडलाईनवर एक फोन आला. या फोनवरून बोलणाऱ्याने असं सांगितलं की ताज हॉटेलच्या एका विशिष्ट गेटमधून काही वेळातच दोन बंदूकधारी आणि मास्क घातलेले लोक घुसणार आहेत. त्यामुळे त्या गेटवरील सुरक्षा वाढवा. हा फोन आल्यानंतर ताज हॉटेलच्या व्यवस्थापनाने थेट पोलिस कंट्रोल रूमला फोन केला आणि फोनवरून दिलेली माहिती सांगितली. पोलिसांनी त्या दृष्टीने सुरक्षा वाढवली आणि आसापासच्या परिसरात शोध घेतला पण तसे कोणीही लोक सापडले नाहीत.

taj hotel
आम्हीही बघून घेऊ!; संजय राऊतांचा भाजपला गंभीर इशारा

ताज व्यवस्थापनाने जेव्हा पोलिसांना या कॉलबद्दल माहिती दिली तेव्हाच हा अफवेचा कॉल असावा असा अंदाज पोलिसांनी होता. पण जेव्हा संपूर्ण शोध घेतला तेव्हा हा फोन साताऱ्यातील कऱ्हाड येथून करण्यात आला असल्याचे समोर आले. मुख्य बाब म्हणजे हा कॉल अवघ्या १४ वर्षांच्या मुलाने केल्याचे तपासात उघड झाले. १४ वर्षाच्या मुलाने असा कॉल का केला किंवा त्याला कोणी कॉल करायला भाग पाडले का? या संबंधीचा अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.