मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी व कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयातून कोरोना रुग्ण पळून जाणे तसेच कोरोना रुग्णांचा मृतदेह गायब होणे या प्रसारमाध्यमातून समजलेल्या घटना अतिशय संतापजनक आहेत. यासंबंधी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत.
योग्य ती चौकशी करून दोषी असलेल्या संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. कांदिवलीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयाला महापौरांनी आज भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
रुग्णालयात दाखल कोरोना बाधित रुग्ण रुग्णालयातून पळून जाणे त्यानंतर त्याचा मृतदेह मिळणे ही गंभीर बाब आहे. शताब्दी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये या ठिकाणी कार्यरत असलेले ईगल कंपनीचे सुरक्षा रक्षक प्रथमदर्शनी दोषी आढळत असल्याचे महापौर म्हणाल्या.
त्यासोबतच रुग्णालयातील संबंधित वार्डमधील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी संबंधित डॉक्टरांना दिले. यापुढे अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी संबंधितांना दिले.
काही दिवसांपासून कोरोना रुग्ण रुग्णालयातून पळून जाण्याच्या घटना प्रसारमाध्यमातून निर्देशनास येत असून या बाबीची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी करावी. तसेच यामध्ये कोणी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही महापौरांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
take action against guilty on corona patients ran away from hospital
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.