मुंबई: कोरोना प्रतिबंधक लसीचा (corona vaccine) डोस घेतल्यानतंर शरीरात लोहचुंबकत्व निर्माण होत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. नाशिकमध्ये असा प्रकार समोर आला आहे. लसीचा डोस घेतल्यानंतर एका व्यक्तीने त्याच्या हाताला लोखंडी व स्टीलच्या वस्तु चिकटत (magnetic power) असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर या प्रकाराची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ आणि राज्याच्या टास्क फोर्सचे (task force) सदस्य तात्याराव लहाने (Tatyarao lahane) यांनी सोशल मीडियावर सुरु असलेली ही चर्चा खोडून काढली आहे. (Tatyarao lahane denied magnetic power comes into body after vaccination)
"मी त्यांचा तो व्हिडिओ पाहिलाय. लोहचुंबकत्व शरीरात येत, ही चर्चा आज नाही, फार दिवसांपासून सुरु आहे. त्यावर वैज्ञनिक संशोधन झालं आहे. आपल्या शरीरात असं कुठलही लोहचुंबकत्व निर्माण होत नाही. या चर्चेला वैज्ञानिक आधार नाही" असे तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केलं आहे.
"लस घेतल्यानंतर शरीरात लोहचुंबकत्व निर्माण होत नाही. कोट्यवधी लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे, त्यात २ टक्के लोकांवर साईड इफेक्ट होतात. शरीरात चुंबकत्व निर्माण होतं हे एक टक्के लोकांच्या बाबतीत पकडलं तर, लाखो लोकांच्या बाबतीत असं झालं पाहिजे. फक्त एकाच माणसाला असं होत असेल, तर ते लसीमुळे नक्कीच झालेलं नाहीय" असे तात्याराव लहाने यांनी सांगितलं.
"तुम्ही याचा लसीशी संबंध जोडू नका. ज्यांच्या शरीरात असं चुंबकत्व निर्माण झालय त्यांनी अशोक थोरात या सर्जनना भेटलं पाहिजे. कुठला आजार असेल, तर त्याचं निदान होऊ शकतं. अंगाला चिकटणाऱ्या गोष्टीला आणि लसीचा संबंध नाही. त्यांना काही होत असेल तर काळजी घेतली पाहिजे" असे तात्याराव लहाने म्हणाले.
सोशल मीडियाच्या लोकांना विनंती करायीच आहे की, "एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असं होत असेल तर, त्यांची तपासणी होण गरजेच आहे. लसीमुळे अशी गोष्ट होत नाही. संभ्रम निर्माण करणाऱ्या अशा गोष्टी पुढे पाठवू नका. त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. सोशल मीडयाने याचा विचार केला पाहिजे, लोकांच्या मनावर याचा परिणाम होतो, एखाद्याच्या बाबतीत अपवादात्मक असं घडलेलं असू शकतं"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.