अलिबाग: तौत्के चक्रीवादळाने (tauktae cyclone) रायगड जिल्ह्यातील (Raigad district) 1 हजार 104 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे तर एका घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू व दोन व्यक्ती जखमी झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 2 हजार 299 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. अद्यापही काही दुर्गम भागातील गावांशी संपर्क झालेला नाही. (tauktae cyclone In Raigad district tehsil wise damage)
रात्री उशिराने कोकण किनारपट्टीत सक्रीय झालेल्या चक्रीवादळाचा उत्पात सुरुच आहे. ताशी 50 किलोमीटरहून अधीक वेगाने वादळी वारे वाहत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाली असल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाचा आहे. दुपारी 11.00 वाजे पर्यंतच्या अंदाजानुसार 1 हजार 104 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे, तर हजारो झाडे उन्मळून पडली आहेत.
वीज पुरवठा पूर्णपणे खंडीत करण्यात आलेला आहे. मुरुड, रोहा, सुधागड पाली तालुक्यातील दुर्गम गावांचा संपर्क तुटला आहे. चक्रीवादळात मोबाइल टॉवरचे नुकसान झालेले असल्याने जिल्ह्यातील संपर्क यंत्रणा विस्कळीत झाली आहे. सायंकाळपर्यंत वित्त हानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रस्त्यांवरील वाहतुक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
तालुकानिहाय झालेले नुकसान
अलिबाग
22 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, 1 प्राण्याचा मृत्यू झाला आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 24 मि.मी. असून, 156 कुटुंबातील 605 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
पेण
1 घराचे अंशता: नुकसान झाले असून, पावसाचे प्रमाण 8 मि.मी. असून, 62 कुटुंबातील 193 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
मुरुड
तालुक्यातील 5 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 32 मि.मी. इतके आहे. 316 कुटुंबातील 1 हजार 67 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
पनवेल
तालुक्यातील 20 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे प्रमाण 11.50 मि.मी. इतके असून, 168 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
उरण
तालुक्यातील 1 घराचे अंशतः नुकसान झाले असून, 1 व्यक्ती मृत्यू तर 1 व्यक्ती जखमी झाला आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 27 मि.मी. आहे. 122 कुटुंबातील 451 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
कर्जत
तालुक्यातील 17 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 7.80 मि.मी. इतके असून, 48 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
खालापूर
तालुक्यातील 91 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 12 मि.मी. इतके असून, 670 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
माणगाव
तालुक्यातील 27 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे प्रमाण 17 मि.मी. इतके असून, 291 कुटुंबातील 1 हजार 309 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
रोहा
तालुक्यातील 10 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 19 मि.मी. इतके असून, 100 कुटुंबातील 523 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
सुधागड
तालुक्यातील 20 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 26 मि.मी. इतके असून, 45 कुटुंबातील 185 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
तळा
तालुक्यातील 23 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, 1 घराचे पूर्णता नुकसान झाले आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 21 मि.मी. असून 36 कुटुंबातील 135 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
महाड
तालुक्यातील 38 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 13 मि.मी. इतकी असून, 195 कुटुंबातील 1 हजार 80 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
पोलादपूर
तालुक्यातील 96 घरांचे अंशत: नुकसान झाले असून 1 व्यक्ती जखमी झाला आहे. पावसाचे सरासरी प्रमाण 41 मि.मी. इतके असून, 81 कुटुंबातील 295 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
म्हसळा
तालुक्यातील 204 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 44 मि.मी. इतके असून, 134 कुटुंबातील 496 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
श्रीवर्धन
तालुक्यातील 519 घरांचे अंशतः नुकसान झाले असून, पावसाचे सरासरी प्रमाण 48 मि.मी. इतके असून, 761 कुटुंबातील 1 हजार 158 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.