कोल्हापूर RTO वाहन नोंदणीत सव्वा कोटींचा कर घोटाळा

विशेष लेखा परीक्षण अहवालात धक्कादायक माहिती उघड
rto
rtorto
Updated on

मुंबई: राज्याच्या परिवहन विभागाच्या आदेशानुसार कोल्हापूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) करण्यात आलेल्या विशेष लेखापरीक्षणात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गेल्या पाच वर्षात एकाच प्रकारच्या आणि सारख्या मॉडेलच्या 613 वाहनांच्या किंमत (vehicle cost) कमी दाखवून 1 कोटी 23 लाख 37 हजार 151 रुपयांचा कर (tax) शासनाच्या (govt) तिजोरीत जमाच झाला नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वाहनाचे बिल कमी किंमतीचे बनावट तयार करून संगनमताने हा घोटाळा झाल्याची शक्यता आहे. (Tax scam in kolhapur rto vehicle registration)

परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापूर विभागाच्या कार्यालयीन कामकाजाची आढावा बैठक घेतली होती. दरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर येथील नवीन वाहनांच्या नोंदणी करताना अनियमितता झाल्याच्या बाब निदर्शनास आली होती. त्यानंतर 2018 ते सध्यास्थीतपर्यंत विशेष लेखा परिक्षण करण्याचे ढाकणे यांनी आदेश दिले होते. दरम्यान लेखा परीक्षण अहवालात गेल्या पाच वर्षात विक्री आणि आरटीओच्या वाहन नोंदणी करतांना मोटार वाहन निरीक्षक आणि संबंधित कर्मचार्यांनी कोणतीही तपासणी न करता कर वसुलीमध्ये अनियमितता केल्याचे उघड झाले आहे.

rto
मुंबई विद्यापीठात मराठीतून मिळणार इंजिनिअरिंगेच शिक्षण

धक्कादायक म्हणजे, एकूण २१ वाहनांचे नोंदणी शुल्क व कर याच्या नोंदी दिसून येत नाहीत. तसेच पावत्यांचे क्रमांक संदिग्ध असून त्या पावत्या हस्तलिखित स्वरूपाच्या आहेत किंवा कसे समजून येत नसल्याचा उल्लेख लेखा परीक्षण अहवालात करण्यात आला आहे. शिवाय या वाहनांना कोल्हापूर व्यतिरिक्त इतर जिल्हे, इतर आरटीओच्या नावावर वाहनांची नोंदनी करण्यात आल्याचे धक्कादायक खुलासा सुद्धा लेखा परीक्षण अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे या सव्वा कोटीच्या कर घोटाळ्याचा मास्टर माईंड कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

rto
८० टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात येऊन गेले, TIFR रिसर्च

लेखा परिक्षणाचे आक्षेप

- नवीन वाहन नोंदणी मध्ये अनियमितता

- एकाच प्रकारच्या व एक सारख्या मॉडेल आणि कंपनीच्या वाहनांच्या किमतींमध्ये फरक

- 613 वाहनांची किंमती कमी दाखवण्यात आली

- कमी किंमत दाखवल्याने कमी कराची नोंद करण्यात आली

- पर्यावरण कर व इतर शुल्क रोखीने किंवा धनाकर्ष स्वरुपात घेण्याचे प्रमाण जास्त आहे.

याप्रकरणात अद्याप चौकशी सुरू आहे. जो पर्यंत या प्रकरणातील एखाद्याची चूक आहे की नाही हे तपासल्या जात नाही तो पर्यंत कोणतेही भाष्य करणे चुकीचे होईल.

- अविनाश ढाकणे, आयुक्त, राज्य परिवहन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.