मुंबई: कोरोनाच्या महामारीमूळे प्रवासी वाहतूक डबघाईस आल्याने राज्य सरकारने रिक्षा, टॅक्सीला भाडेवाढ लागू केली आहे. यामध्ये रिक्षा, टॅक्सीला प्रत्येकी 3 रूपये भाडेवाढ दिल्याने, आता रिक्षासाठी 21 तर टॅक्सीसाठी 25 रूपये मोजावे लागणार आहे. नाईट चार्जसाठी एकूण प्रवासाच्या किलोमीटर भाड्याच्या 25 टक्के जास्त भाडे आकारलं जाणार आहे. आजपासून मुंबई महानगरात नवीन दर लागू झाले आहेत.
खटुआ समितीच्या शिफारशीनुसार दरवर्षी 1 जून रोजी भाडेवाढ करणे आवश्यक होते. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून रिक्षा, टॅक्सीला भाडेवाढ देण्यात आली नव्हती, त्यामुळे खटूआ समितीच्या शिफारशीचा आधार घेऊनच यावेळी रिक्षा, टॅक्सीला प्रत्येकी 3 रूपयांची भाडेवाढलागू केली असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले होते. त्यानुसार 1 मार्च पासून मुंबई महानगरांमध्ये ही भाडेवाढ लागू झाली आहे. रिक्षा, टॅक्सी चालक मालकांनी आपल्या वाहनाचे मिटर कॅलिब्रेशन करून घेण्यासाठी 31 मे पर्यंत मुदत दिली आहे. तर 1 जूनपासून रिक्षा, टॅक्सीचे मीटरमध्ये नवीन दर दिसणे बंधनकारक राहणार आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अशी आहे नवीन भाडेवाढ
पहिल्या टप्याला रिक्षाला 18 ऐवजी आता 21 रुपये मोजावे लागेल तर पहिल्या टप्यानंतर दर किलोमीटर 12.1 रुपये यापूर्वी आकारल्या जात होते. त्यामध्ये 2.1 रुपयांची वाढ करून आता 14.20 रूपये तर टॅक्सीला 22 ऐवजी 25 रुपये मोजावे लागणार असून, पहिल्या टप्यानंतर दर किलोमीटर 14.3 रुपयांमध्ये 2.9 रुपये वाढ करून आता दर किलोमीटर 16.93 रूपये आकाल्या जाणार आहे.
------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Taxi and rickshaw fare hike from today check out the here new rates
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.