Rain News: धो धो पावसामुळे टॅक्सीवाले मालामाल; अतिरिक्त भाडे आकारत चाकरमान्यांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Mumbai Rain News: मुंबईत गेल्या दोन तासांपासून सतत पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
Mumbai Rain
Mumbai RainESakal
Updated on

मान्सूनने महाराष्ट्रात पुन्हा एकदा दणका दिला आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसाने अनेक शहरे जलमय झाली आहेत. पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचू लागले आहे. या पावसामुळे प्रवाशांचेही हाल होत आहेत. दिल्लीहून मुंबईला येणारी दोन उड्डाणे हैदराबादकडे वळवण्यात आली आहेत. लोकल ट्रेनमध्येही मोठी गर्दी असते. सध्या IMD ने पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. बुधवार सायंकाळी 5:30 पासून कोसळणाऱ्या धो धो पावसामुळे दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मोहम्मद अली रोडवर ट्राफिक जाम झाले होते.

Mumbai Rain
Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग! सर्वाधिक पावसाची नोंद, जाणून घ्या कोणत्या परिसरात किती कोसळला?

टॅक्सीवाले भायखळा पर्यंत जाण्यासाठी मीटर बंद करून 200 रु. तर दादर स्टेशनपर्यंत 600 रु भाडे आकारित होते. रात्रीची वेळ आणि बरसणाऱ्या सरीमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मुंबई महानगर पालिका मुख्यालय जवळील बेस्ट बसची वाट पाहणारे प्रवासी मग नाईलाजास्तव टॅक्सीने म्हणेल ते भाडे देऊन जात होते. जेजे सिग्नल येथे तसेच भेंडी बाजार, चार नळ आणि नळ बाजार, गुलालवाडी येथील सखल भागात फुटभर पाणी तुंबल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहणे चालविणाऱ्यांची चांगलीच त्रेधा उडाली होती.

अचानक आलेल्या पावसामुळे हात गाडी ओढणाऱ्या कष्टकऱ्यांना पावसात भिजल्याने गारठा भरला होता. संथ झालेली ट्राफिक आणि घरी जाण्याची घाई यामुळे आणखीच गोंधळ उडाला होता. मात्र अशा ही परिस्थितीत जे जे उड्डाणं पूल, जेजे जंक्शन आणि पायधुनी, भेंडी बाजार चौक येथील ट्राफिक पोलीस अंमलदार वाहतूक सुरळीत करण्यासाठी चक्क पावसात भिजून कर्तव्य पार पाडीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.