मुंबई : उच्चभ्रू रहिवाशांच्या लोखंडवाला परिसरात रात्री घराबाहेर चहा पिण्याची लहर आली तर साध्यासुध्या टपरीवर नव्हे तर चक्क ७० लाखांच्या ऑडी मोटारीतील स्टॉलमधून २० रुपयांचा कटिंग चहा मिळू शकतो. मनु शर्मा आणि अमित कश्यप यांनी चहाचा हा आगळावेगळा ‘ओडी टी’ स्टॉल सुरु केला आहे.
गेले सहा महिने त्यांचा स्वतःच्या ऑडिमधील चहास्टॉल सुरु आहे आणि त्याचा व्हिडिओदेखील समाजमाध्यमांवर फिरतो आहे. एरवी मुंबई पंचतारांकित हॉटेलपासून ते टपरीवर किंवा हातात गरम चहाची किटली घेऊन फिरणाऱ्या चहावाल्यांकडूनही चहा मिळतो. मात्र, या ‘ऑडी’तील चहाची चव घेण्यासाठी उच्चभ्रूंचीही चांगलीच गर्दी होते.
आम्ही बरेचदा रात्री बाहेर फिरत होतो, पण या विभागात रात्री चहा मिळणेही कठीण होते, त्यामुळे आम्हीच चहा स्टॉल टाकण्याचे ठरविले, असे हरियानाच्या शर्मा यांनी सांगितले. विशेष म्हणजे या चहाची लज्जत देखील न्यारीच असल्याने त्याचा स्वाद घेण्यासाठी दूरदूरहून लोक येतात, असाही अनुभव आहे.
शर्मा हे पूर्वी आफ्रिकेत नोकरी करीत होते, तर पंजाबचे कश्यपचे हे दिवसा शेअर ट्रेडिंग करून रात्री हा स्टॉल चालवतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते तेच चहा विक्रीचा व्यवसाय करतात असे नाही, हेच आमच्या ऑडीमधील स्टॉलवरून दिसून येते. सायकलस्वार आणि जग्वार गाडीचे मालक अशा दोघांच्याही जिभेवर आमच्या चहाची चव रेंगाळत असते, असेही शर्मा यांनी बोलून दाखवले.
घरीच केला चहा बनविण्याचा सराव
या चहाच्या चवीचे रहस्य म्हणजे त्यांनी घरी पुष्कळ दिवस चहा बनवण्याचा सराव केला. नंतर त्यांनी वेगवेगळ्या रेसिपी वापरून चविष्ट चहा केला व त्यांच्याच ऑडी गाडीतून विकण्याचे ठरविले. अनेक खटपटी केल्यावर शेवटी त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केलेच.
मोटारीच्या डिकीतून स्टूल काढून त्यावर चूल ठेऊन ते आल्याचा स्पेशल चहा करतात व लोकांना देतात. चहा, साखरेच्या बरण्या आणि दुधाचा थर्मासही सज्ज असतोच. चहाचे पैसे देण्यासाठी त्यांनी समोरच पेटीएमचा स्कॅनकोडही ठेवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.