Team India Victory Parade: टीम इंडियाच्या स्वागतासाठी 'बेस्ट'ची बस का नाही? गुजरातची बसच का? रोहित पवारांचा सवाल

Team India Victory Parade Marathi News: मुंबईत दाखल झाल्यानंतर या जगज्जेत्या टीम इंडियाचं ओपन बसमधून स्वागत यात्रा निघणार आहे.
Gujarat Passing Bus For Team India victory Parade Nariman Point To Wankhede Stadium
Gujarat Passing Bus For Team India victory Parade Nariman Point To Wankhede Stadium esakal
Updated on

Team India Victory Parade: T20 वर्ल्डकप विजेता भारतीय संघ आज ट्रॉफीसह भारतात दाखल झाला. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर टीम काही वेळातच मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर या जगज्जेत्या टीम इंडियाचं ओपन बसमधून स्वागत यात्रा निघणार आहे. पण यासाठी वापरण्यात आलेल्या बसवर आमदार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. (Team India Victory Parade there no BEST bus used to welcome why it import from Gujrat raised question from Rohit Pawar)

रोहित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं की, तुम्ही खेळाडूंना ताकद दिली त्यामुळं खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्यामुळं आम्ही आनंदी आहोत. पण आता याची विजयी रॅली जर मुंबईत काढली जातेय तर त्यासाठी जी बस वापरण्यात येणार आहे ती महाराष्ट्र शासनाच्या ताफ्यातील किंवा विशेषतः मुंबई महापालिकेच्या बेस्ट प्रशासनाची बस वापरायला हवी. कारण बेस्टच्या बसेसमुळं मुंबईकरांचा प्रवास सुखकर होत आहे.

Gujarat Passing Bus For Team India victory Parade Nariman Point To Wankhede Stadium
Wankhede Stadium: टीम इंडियाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम परिसरात तुफान गर्दी; चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थितीमुळं गोंधळ

पण टीम इंडिया जर मुंबईत येत आहे तिथं बेस्टचीच बस वापरायला हवी मग ती कशीही असो कारण ती प्रथा आहे. त्यासाठी गुजरातहून बस आणण्याची गरज काय? त्यामुळं या रॅलीसाठी बेस्टची बस वापरावी अशी विनंती आम्ही बीसीसीआयकडं करणार आहोत. त्यावर बीसीसीआय काय निर्णय घेते ते पहावं लागणार आहे.

Gujarat Passing Bus For Team India victory Parade Nariman Point To Wankhede Stadium
Team India Victory Parade Mumbai : मुंबईतील अनेक मार्गांवरील वाहतूक वळवली, कडक सुरक्षेत निघणार टीम इंडियाची विजयी मिरवणूक

पण आता गुजरातहून बस आली आहे तर त्या बसला आम्ही चांगली पार्किंगची जागाही उपलब्ध करुन देऊ पण महत्वाचं काय तर बेस्टची बस त्यांनी वापरायला हवी. पण आत्ताचे बीसीसीआयचे जे प्रमुख आहेत त्यांना हे कदाचित माहिती नसेल. त्यामुळं त्यांनी मोठी चांगली बस गुजरातहून आणली असेल. पण मोठ्या बसपेक्षा आम्ही ज्या भावनिक गोष्टीनं जोडलो गेलो आहोत त्या बेस्टची बस वापरली असती तर आम्हाला अधिक आनंद झाला असता, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.