Wankhede Stadium: टीम इंडियाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम परिसरात तुफान गर्दी; चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थितीमुळं गोंधळ

T-20 क्रिकेटचं विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर आज मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाच्या स्वागतानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
T20 World Cup Victory Parade_Wankhede Stadium
T20 World Cup Victory Parade_Wankhede Stadium
Updated on

मुंबई : T-20 क्रिकेटचं विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर आज मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाच्या स्वागतानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी स्टेडियम परिसरात तरुणांची तुफान गर्दी झाली आहे. यामुळं स्टेडियमच्या आतमध्ये शिरत असताना चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळं काही काळ गोंधळाचं वातावरण झालं. (Team india victory parade Wankhede Stadium stormy crowd stampede like condition)

टीम इंडियाचं आज सकाळी भारतात आगमन झालं, त्यानंतर टीमनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर ही टीम मुंबईकडं रवाना झाली. त्यानंतर मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी विजयी रॅली काढण्यात येणार आहे. छत नसलेल्या ओपन बसमधून टीमची मिरवणूक निघणार आहे. या विजेत्या टीमच्या स्वागतासाठी सध्या नरिमन पॉईंट आणि स्टेडियम परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली पहायला मिळत आहे.

T20 World Cup Victory Parade_Wankhede Stadium
Lalit Patil Escape Case: ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणारे दोन पोलिस बडतर्फ; अमली पदार्थ प्रकरण

नेमकं काय घडलंय?

दरम्यान, जगज्जेतेपदाचं सेलिब्रेशन होणार असल्यानं वानखेडे स्टेडियममध्ये जिथं मुख्य कार्यक्रम होणार आहे तिथं सर्वांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. त्यासाठी जो पहिला येईल त्याला प्रवेश मिळेल या तत्वावर इथं प्रवेश दिला जात आहे. त्यामुळं आतमध्ये जागा मिळावी तसंच बाहेर पाऊस असल्यानं आतमध्येच थांबाव यासाठी तरुणांनी स्टेडियमच्या गेटवर तुफान गर्दी केली.

पण या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या बॅरिकेट्समुळं या गर्दीला आतमध्ये जाताना अडचण निर्माण झाल्यानं काहीजण इथं पडले, त्यामुळं चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं पण आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळते आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.