तुमचा दररोजचा ऑक्सिजन म्हणजेच मोबाईल डेटा 'इतक्या' पटीने महागणार...

तुमचा दररोजचा ऑक्सिजन म्हणजेच मोबाईल डेटा 'इतक्या' पटीने महागणार...
Updated on

मुंबई - तुम्ही एका रात्रीत वेबसिरीजचा संपूर्ण सिझन संपवतात ? ऑफिस किंवा कॉलेजला येता जाता तुम्हाला ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये व्हिडीओ किंवा ऑनलाईन गेमिंगची आवड आहे. मग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि काहीशी वाईट बातमी. आपल्या सर्वांना माहित आहे की टेलिकॉम कंपन्या सध्या प्रचंड आर्थिक संकटात आहेत. अशात या कंपन्यांना दर वाढवल्याशिवाय काहीही पर्याय नाही असं निती आयोगाकडून सांगण्यात आलंय. यामुळे थेट तुमच्या आमच्या खिशाला चाट पडणार आहे. 

मोबाइल डेटा आणि कॉलिंगची किमान किंमत निश्चित करण्यासाठी निति आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तयारी दर्शवलीये. त्यामुळे येत्या काळात मोबाईल कॉलिंग आणि मोबाईल डेटा महागण्याची शक्यता आहे. दरम्यान भारतीय टेलिकॉम कंपन्यांमध्ये कॉलिंग आणि डेटाच्या किमतीवरून युद्ध सुरु आहे. अशात यामध्ये रेग्युलेटरी एजन्सीने हस्तक्षेप करण्यास नीती आयोगाने सांगितल्याची माहिती समोर येतेय.

दरम्यान सध्या भारतीय ग्राहकांना ज्या दराने मोबाईल डेटा विकला जातोय या दरांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या वोडाफोन आयडिया आणि एअर तेल या कंपन्यांकडून प्रति GB डेटा चार रुपयांना विकला जातोय तर रिलायन्स जिओ कडून डेटा चे दर प्रति GB ३.९० रुपये इतके आहेत. मोबाइल डेटा आणि कॉलिंगची किमान किंमत निश्चित झाल्यास तुम्ही दररोज वारेमाप  वापरणारा मोबाईल डेटा किंवा इंटरनेटचे दर तब्ब्ल पाच रे दहा पटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

सध्या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे सर्व टेलिकॉम कंपन्यांशी चर्चा सुरु आहे. मोबाईल इंटरनेटचे दर वाढल्यावर ग्राहकांकडून कशी प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

telecom companies to sell mobile data ten times costlier than current prices

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.