वसई विधानसभा: वसई मध्ये एन निवडणुकीच्या तोंडावत महायुतीत बिघाडी झाल्याचे समोर आले आहे. निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना वसईतील महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे घटक पक्ष नाराज असल्याचे समोर आले आहे. भाजपाकडून आम्हाला योग्य मान सन्मान मिळत नाही, विचारात घेतले जात नाही अशी तक्रार दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. या नाराजीमुळे तसेच आमंत्रण न मिळाल्याचे सांगत शुक्रवारी झालेल्या भाजप नेत्या स्मृती ईराणी यांच्या सभेलाही दोन्ही पक्षांचे नेते गैरहजर होते.