डोंबिवली: कोण काय प्रचार करत, कोण काय अफवा पसरवत आहेत त्याकडे लक्ष देऊ नका. अफवांना बळी पडू नका. कोणाला आवडत असेल कोणाला आवडत नसेल मात्र युती धर्म पाळा, पक्षाला आवडणार नाही, आपल्यावर कोणी शंका घेईल असे काही करू नका असा सल्ला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी युती कार्यकर्त्यांना दिला. तसेच आमचे काम सुरू आहे तुम्ही निश्चिंत रहा असा दिलासा भाजपला दिला.