जाणून घ्या 'कधी येणार' कोरोनावरील लस; आजपासून चाचण्या सुरु...

जाणून घ्या 'कधी येणार' कोरोनावरील लस; आजपासून चाचण्या सुरु...
Updated on

मुंबई - एकीकडे चीनमधील वूहान शहर कोरोनमुक्त होताना पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे जगातील इतर देशांमध्ये मात्र कोरोनाची भीती वाढतेय. जगभरातील नागरिक कोरोनामुळे धास्तावलेत. इटलीला लॉक-डाऊन केलंय तर इराणमध्ये देखील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. भारतात देखील दरोरोज कोरोना बाधितांची संख्या वाढतेय. महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाबाधित पॉझिटिव्ह केसेस आहेत. अशात सर्वांकडून आशा व्यक्त केली जातेय ती म्हणजे कोरोनावरील औषध किंवा लसीबद्दल. कोरोनावर औषध किंवा लस कधी येणार यावर सर्वांचं लक्ष आहे. 

जगभरातील संशोधकांकडून कोरोनावर औषध आणि लस शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. अशात वैद्यकीय विभागातील माहितीनुसार कोरोनावर लस येण्यास आणखी १८ महिने लागणार असल्याचं बोललं जातंय. अमेरिकेत आजपासून कोरोना व्हायरसवरील लसीवर चाचणी सुरु होणार आहे. एकूण ४५ निरोगी नागरिकांवर या लसीची चाचणी करण्यात येणार आहे.

या लसीच्या चाचणीतून कोरोना लसीच्या दुष्परिणामांची माहिती घेतली जाणार आहे. यावर अभ्यास करून कोरोनावरील लस अधिक उपायकारक कशी होईल यावर संशोधन करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनावरील लस येण्यासाठी आणखीन १८ महिने लागणार असल्याचं समजतंय. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अमेरिका (एनआयएच) द्वारे चाचण्यांना अर्थसहाय्य दिले जात आहे. याबाबत ट्रम्प प्रशासनातील नाव न सांगण्याच्या अटीवर या माहितीला पुष्टी दिली आहे.

कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात दीड लाखांहून अधिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे जवळजवळ सहा हजार नागरिकांना यामुळे आपले प्राण गमवावे लागलेत. महाराष्ट्रातही कोरोनाचा आकडा दररोज वाढतोय. दिनांक १६ मार्च दुपारपर्यंत महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह केसेसचा आकडा ३७ वर गेलीय. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

testing of antidote on corona virus starts today injection will come after 18 moths on

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.