"आरोपासंदर्भात ठोस पुरावे नाहीत"; ठाकरे गटाच्या आमदाराची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, शिंदे गटाला मोठा दिलासा!

Thackeray group
Thackeray group
Updated on

शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आमदार निधी वाटपातील दुजाभाव प्रकरणी रवींद्र वायकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

राज्यातील आमदारांच्या विकास निधी वाटपात सरकार दुजाभाव करीत असल्याचा आरोप वायकर यांनी याचिकेत केला होता. या याचिकेवर न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या द्विसदस्य खंडपिठानं निर्णय दिला.

Thackeray group
"सरन्यायाधीशांना एवढं संतापलेलं बघितलं नाही"; आता राहुल नार्वेकरांना निर्णय घ्यावाच लागेल, नाहीतर...

रवींद्र वायकर यांनी यांनी दाखल केलेली याचिका गुणवत्तेच्या आधारावर कमकुवत आहे. तसेच आरोपासंदर्भात ठोस पुरावे नाहीत, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. (Latest Marathi News)

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदार निधी वाटपात तफावत असल्याचा आरोप करणारी रिट याचिका रवींद्र वायकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. 

Thackeray group
Supriya Sule: पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढावी लागली, असा दिवस येईल वाटलं नव्हतं; सुप्रिया सुळेंची खंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.